पहिल्या पाचमध्ये कित्येक महिन्याने आली झी मराठीवरील ही मालिका तर टिआरपीत ठरलीय ही मालिका अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 06:12 PM2021-01-30T18:12:55+5:302021-01-30T18:19:50+5:30

या आठवड्याच्या टिआरपीनुसार पहिल्या पाचमधील चार मालिका या स्टार प्रवाह वाहिनीवरील आहेत. केवळ एक मालिका ही झी मराठीवरील आहे.

zee marathi's Aggabai Sasubai is on number four as per barc india | पहिल्या पाचमध्ये कित्येक महिन्याने आली झी मराठीवरील ही मालिका तर टिआरपीत ठरलीय ही मालिका अव्वल

पहिल्या पाचमध्ये कित्येक महिन्याने आली झी मराठीवरील ही मालिका तर टिआरपीत ठरलीय ही मालिका अव्वल

googlenewsNext
ठळक मुद्देचौथ्या क्रमांकावर झी मराठीवरील अग्गंबाई सासूबाई ही मालिका आहे. बबड्या आता सुधारला असून आपली चूक त्याला कळली आहे असे कथानक मालिकेत आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे.

काही महिन्यांपूर्वी झी मराठीवरील कार्यक्रम हे टिआरपी रेसमध्ये पहिल्या पाच मध्ये असायचे. माझ्या नवऱ्याची बायको, अग्गंबाई सासूबाई, माझा होशील का, चला हवा येऊ दे यांसारख्या कार्यक्रमांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. कलर्स मराठी अथवा स्टार प्रवाहवरील मालिका पहिल्या पाचमध्ये कधीच नसायच्या. पण आता सगळ्या मालिकांना मागे टाकत गेल्या काही महिन्यांपासून स्टार प्रवाहवरील मालिका अधिक फेमस झाल्या आहेत. या आठवड्याच्या टिआरपीनुसार पहिल्या पाचमधील चार मालिका या स्टार प्रवाह वाहिनीवरील आहेत. केवळ एक मालिका ही झी मराठीवरील आहे.

बार्क (ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडिया) च्या रिपोर्टनुसार, स्टार प्रवाहवरील मुलगी झाली हो ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. मुलगी झाली हो या मालिकेची कथा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेत एका महिलेने सगळ्यांचा विरोध पत्करून मुलीला जन्म दिला आहे इतकंच नाही तर एकटीने तिची संपूर्ण जबाबदारीही स्वीकारली आहे.

दुसऱ्या क्रमांकावर फुलाला सुगंध मातीचा ही मालिका आहे. आजही अनेक कुटुंबांमध्ये मुलीचं शिक्षण हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांचं वर्चस्व जरी पाहायला मिळत असलं तरी लग्नानंतर तिने घरी धुणी भांडी करावीत, घरसंसारात स्वत:ला झोकून द्यावं अशी अपेक्षा सासरच्या मंडळींकडून केली जाते. मात्र एकमेकांची स्वप्नं समजून घेणं आणि पूर्ण करायला साथ देणं म्हणजेच खरा संसार असतो. एकमेकांत मिसळून फुलण्यालाच संसार म्हणायचा असतो. फुलाला सुगंध मातीचा या मालिकेची गोष्ट अशाच स्वप्नांना पूर्ण करणाऱ्या संसाराची आहे.

तिसऱ्या क्रमांकावर सहकुटुंब सहपरिवार ही मालिका आहे.

चौथ्या क्रमांकावर झी मराठीवरील अग्गंबाई सासूबाई ही मालिका आहे. बबड्या आता सुधारला असून आपली चूक त्याला कळली आहे असे कथानक मालिकेत आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे. हे कथानक प्रेक्षकांना आवडले असून त्यामुळे या मालिकेचा टिआरपी चांगलाच वाढला आहे. या मालिकेत तेजश्री प्रधान, निवेदिता सराफ, गिरीश ओक, आशुतोष पत्की यांच्या मुख्य भूमिका आहेत.

पाचव्या क्रमांकावर रंग माझा वेगळा ही मालिका आहे. या मालिकेच्या कथानकाने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. रंगावरून, वर्णावरून मान अपमानाच्या अनेक गोष्टी आपण ऐकतो. याच विषयावर आधारित ही मालिका आहे. या मालिकेत अभिनेत्री रेश्मा शिंदे मुख्य भूमिकेत आहे. ही मालिका गेल्या आठवड्यात पहिल्या क्रमांकावर होती. पण या आठवड्यात या मालिकेचा टिआरपी ढासळलेला आहे.

Web Title: zee marathi's Aggabai Sasubai is on number four as per barc india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.