शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

मी यूट्युबर: कोकण समजावणारा इंजिनीअर

By बाळकृष्ण परब | Updated: November 6, 2022 10:11 IST

आपल्या कोकणाला निसर्गसौंदर्याची दैवी देणगी लाभली आहे. येथील स्वच्छ आणि सुंदर समुद्र किनारे आणि सह्याद्रीतील घनदाट वने मन मोहून टाकणारी आहेत.

आपल्या कोकणाला निसर्गसौंदर्याची दैवी देणगी लाभली आहे. येथील स्वच्छ आणि सुंदर समुद्र किनारे आणि सह्याद्रीतील घनदाट वने मन मोहून टाकणारी आहेत. अशा या समृद्ध कोकणाकडे गेल्या काही वर्षांपासून पर्यटकांची पावले मोठ्या प्रमाणावर वळू लागली आहेत. मात्र तळकोकणात पर्यटनाचा फारसा विकास अद्याप झालेला नसल्याने इथे येणारे पर्यटक ठरावीक बिचेस आणि काही धार्मिक स्थळांपुरते मर्यादित राहतात. मात्र अद्याप प्रकाशझोतात न आलेली कोकणातील पर्यटनस्थळे, तेथील जीवनशैली, शेती, बागायती यांची माहिती एक तरुण कोकणी रानमाणूस या यूट्युब चॅनलच्या माध्यमातून करून देत आहे. त्याचं नाव आहे प्रसाद गावडे.

प्रसाद हा मुळचा इंजिनियर. मात्र त्याने शहरात मोठ्या पगाराच्या नोकरीची कास न धरता कोकणातील गावात शाश्वत विकास आणि इकोटुरिझमच्या माध्यमातून स्वयंरोजगाराची वाट धरली. कोकणातील पर्यावरण आणि पर्यटनाबाबत कधीही समोर न आलेली माहिती देणारा त्याचा कोकणी रानमाणूस हा त्याचा यूट्युब चॅनल अल्पावधीतच लोकप्रिय झाला. सोबतच कोकणाची माहिती देणारा रानमाणूस ही त्याची ओळख बनली. आज त्याच्या कोकणी रानमाणूस ह्या यूट्युब चॅनेलचे तब्बल  दोन लाखांहून अधिक सब्स्क्रायबर्स आहेत. 

निसर्ग समृद्ध असलेल्या कोकणातील न पाहिलेल्या पर्यटनस्थळांची माहिती देतानाच तेथील पर्यावरण संवर्धनाविषयी प्रसाद आग्रही आहे. कोकणाच्या पर्यावरणाला हानिकारक ठरतील, अशा गोष्टींबाबतही तो आवाज उठवत असतो. कोकणातील पारंपरिक लोकजीवन, शेती, बागायती, मासेमारी यांची माहिती तो त्याच्या यूट्युब चॅनलच्या माध्यमातून देत असतो. एवढंच नाही तर इको टुरिझमच्या माध्यमातून तो पर्यटकांना कोकणी लोकजीवनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळवून देत आहे. त्याबाबतची त्याची मांगर फार्म स्टे ही संकल्पना चांगलीच लोकप्रिय झालेली आहे.  

कोकणी रानमाणूस आणि कोकणातील इकोटुरिझमबाबत प्रसाद सांगतो की, माणूस निसर्गाधारीत जीवनशैलीत एक समाधानी आणि शाश्वत जीवनपद्धती जगू शकतो पण ह्या जगण्यातला स्वर्गीय आनंद त्याला कळायला हवा. आम्ही पर्यटकांना शेतकऱ्यांसोबत जोडून देऊन त्यांच्या शेतातूनच कोकणी मेवा खरेदी करता येईल आणि मांगर फार्मस्टे या मातीच्या कौलारू शेत घरात राहून कोकणी जीवन सुद्धा अनुभवता येईल अशी ह्या मागची संकलपना आहे.

टॅग्स :YouTubeयु ट्यूब