शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Google चा करोडो यूजर्सना झटका, YouTube वर जाहिरातीशिवाय व्हिडिओ पाहणे महागणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 19:52 IST

The Verge च्या रिपोर्टनुसार, पुढील वर्षी १३ जानेवारी २०२५ पासून यूट्यूब प्रिमियम सबस्क्रिप्शन प्लॅन महाग होईल.

गुगल (Google) आपल्या लाखो यूट्यूब (YouTube) युजर्सना नवीन वर्षात मोठा धक्का देणार आहे. जाहिरातींशिवाय यूट्यूबवर व्हिडिओ पाहणे अधिक महाग होणार आहे. रिपोर्टनुसार, कंपनी जानेवारीपासून यूट्यूब प्रीमियम सब्सक्रिप्शन प्लॅन महाग करणार आहे. कंपनीने अलीकडेच जागतिक स्तरावर यूट्यूबचे सबस्क्रिप्शन प्लॅन वाढवले ​​होते. यूट्यूबची नवीन प्रीमियम सदस्यता योजना १३ जानेवारी २०२५ पासून प्रभावी होईल. त्यामुळे युजर्स १२ जानेवारीपर्यंत जुन्या दराने सबस्क्रिप्शन प्लॅन खरेदी करू शकतात.

The Verge च्या रिपोर्टनुसार, पुढील वर्षी १३ जानेवारी २०२५ पासून यूट्यूब प्रिमियम सबस्क्रिप्शन प्लॅन महाग होईल. कंपनी पूर्वीपेक्षा १० डॉलर जास्त चार्ज आकारणार आहे. सध्या यूट्यूब प्रिमियमच्या बेसिक प्लॅनसाठी ७२.९९ डॉलर खर्च करावे लागतील. प्लॅन दर सुधारित केल्यानंतर युजर्सना ८२.९९ डॉलर खर्च येईल. अशा प्रकारे युजर्सला यूट्यूब प्रिमियमसाठी १० डॉलर जास्त खर्च करावे लागतील.

सध्या भारतात यूट्यूब प्रिमियमच्या किमतीत कोणतीही वाढ जाहीर करण्यात आलेली नाही. कंपनीने काही महिन्यांपूर्वीच भारतात यूट्यूब प्रिमियम प्लॅन महाग केला आहे. मात्र, जागतिक बाजारपेठेत जेव्हा-जेव्हा यूट्यूब प्रिमियम प्लॅनचे दर वाढवले ​​गेले आहेत, तेव्हा त्याचा परिणाम भारतातही उशिरा का होईना दिसून आला आहे. 

कंपनीचे म्हणणे आहे की, प्लॅटफॉर्मची सेवा सुधारण्यासाठी, प्लॅनचे दर वाढवले ​​जातील जेणेकरून युजर्सना चांगली गुणवत्ता मिळू शकेल. १३ जानेवारीपासून नवीन दर लागू झाल्यानंतर युजर्सना पहिल्या बिल सायकलमध्ये अधिक खर्च करावा लागेल. मात्र, कंपनी विद्यमान प्रमोशनल आणि ट्रायल ऑफर बंद करणार नाही, त्या पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील.

भारतात यूट्यूब प्रिमियम प्लॅनसाठी युजर्सला वैयक्तिक दरमहा १४९ रुपये खर्च करावे लागतील. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना दरमहा ८९ रुपये खर्च करावे लागतात. फॅमिली प्लॅनसाठी भारतात प्रति महिना २९९ रुपये आकारले जातात. प्रीपेड मासिक योजनेसाठी युजर्सना दरमहा १५९ रुपये खर्च करावे लागतील. त्याच वेळी, तिमाही योजनेसाठी ४५९ रुपये आणि वार्षिक योजनेसाठी १४९० रुपये खर्च येतो.

टॅग्स :YouTubeयु ट्यूबtechnologyतंत्रज्ञान