शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

युट्युब रेड आणि गुगल प्ले म्युझिकचा होणार विलय

By शेखर पाटील | Updated: July 28, 2017 18:38 IST

गुगल कंपनीने आपल्या युट्युब रेड आणि गुगल प्ले म्युझिक या दोन प्रिमीयम सेवांचा विलय करून एकच नवीन स्ट्रीमिंग सेवा सुरू करण्याचे जाहीर केले आहे.युट्युब साईटवरील बर्‍याच व्हिडीओजमध्ये जाहिराती येत असतात. काही व्हिडीओजच्या प्रारंभी तर काहींच्या मध्ये यांचा समावेश करण्यात आलेला असतो. मात्र अनेकांना जाहिरातींचा व्यत्यय नकोसा वाटतो. यामुळे युट्युब साईटवर ...

गुगल कंपनीने आपल्या युट्युब रेड आणि गुगल प्ले म्युझिक या दोन प्रिमीयम सेवांचा विलय करून एकच नवीन स्ट्रीमिंग सेवा सुरू करण्याचे जाहीर केले आहे.

युट्युब साईटवरील बर्‍याच व्हिडीओजमध्ये जाहिराती येत असतात. काही व्हिडीओजच्या प्रारंभी तर काहींच्या मध्ये यांचा समावेश करण्यात आलेला असतो. मात्र अनेकांना जाहिरातींचा व्यत्यय नकोसा वाटतो. यामुळे युट्युब साईटवर आता ‘युट्युब रेड’ नावाची सेवा सुरू करण्यात आली होती. याच्या अंतर्गत दरमहा ९.९९ डॉलर्स भरल्यानंतर या साईटवरील कोणताही व्हिडीओ जाहिरातींविना पाहता येतात. याशिवाय या सेवेचा उपयोग करून कुणीही कोणताही व्हिडीओ डाऊनलोड करून आपल्या व्हिडीओवर नंतर ‘ऑफलाईन’ पध्दतीने पाहू शकतो. तसेच स्मार्टफोनवर कोणतेही अ‍ॅप सुरू असतांनाही युट्युब साईटवरील व्हिडीओचा त्या युजरला आनंद लुटता येतो. एवढेच नव्हे तर एकदा का ही सेवा कार्यान्वित केली तर त्या युजरला ‘गुगल प्ले म्युझिक’च्या प्रिमीयम सेवेसाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. अर्थात युट्युब साईटवर जे व्हिडीओज आधीच ‘पे-पर-व्ह्यु’ या पध्दतीने सशुल्क उपलब्ध आहेत (उदा. नवीन सिनमा वगैरे) त्यांचे मुल्य मात्र त्या युजरला मोजावे लागणार आहे. ‘युट्युब रेड’ ही सेवा अद्याप भारतात सादर करण्यात आलेली नाही. 

तर दुसरीकडे गुगल कंपनीने आपली गुगल प्ले म्युझिक ही संगीतविषयक प्रिमीयम सेवा भारतात काही महिन्यांपुर्वीच लाँच केली आहे. गुगल प्ले म्युझिकवर संगीताचा अजस्त्र साठा आहे. जगभरातल्या विविध भाषांमधील तब्बल चार कोटींपेक्षा गाणी आणि अल्बम्सचा साठा यावर आहे. कुणीही याचा अगदी अल्पदरात आनंद घेऊ शकते. ही सेवा लाँच करतांना गुगल कंपनीने काही सवलती दिल्या होत्या. आता मात्र प्रत्येक महिन्याला ९९ रूपयांची आकारणी करून ही सेवा घेता येते.  अँड्रॉइड आणि आयओएस प्रणालीसह डेस्कटॉपवरूनही युजर्स या सेवेचा वापर करू शकतात. विशेष म्हणजे संबंधीत युजर आपल्या प्ले-लिस्टमध्ये तब्बल ५० हजार गाणी मोफत अपलोड करू शकतात. यासोबत गुगलची रेडिओ सेवादेखील मोफत ऐकता येते. सर्वात महत्वाचे म्हणजे यात ऑफलाईन सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे. यामुळे कुणीही युजर आपल्याला हवे ते गाणे ऑफलाईन असतांनाही ऐकू शकतो. 

दरम्यान, युट्युब रेड आणि गुगल प्ले म्युझिक या सेवांना एकत्र करण्यात येणार असून याबाबत ‘व्हर्ज’ या टेक पोर्टलने सविस्तर वृत्त दिले आहे. विशेष म्हणजे युट्युबच्या हेड ऑफ म्युझिक या जबाबदार पदावर असणार्‍या लॉयर कोहेन यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांच्यानुसार या दोन्ही सेवांचा विलय करून एकच स्ट्रीमिंग सेवा सुरू केली जाईल. तोवर या दोन्ही सेवांचा विद्यमान ग्राहकांना वापर करणे शक्य असून नवीन सेवेवर शिफ्ट होण्यासाठी त्यांना योग्य वेळी सूचना देण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. अर्थात गुगल कंपनीची ही नवीन सेवा अ‍ॅपल म्युझिक आणि स्पॉटीफॉय यांच्यासाठी धोक्याची सूचना असेल असे मानले जात आहे.