शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

युट्युब मॅसेंजर: व्हिडीओ शेअरिंगसोबत करा चॅटींग !

By शेखर पाटील | Updated: August 11, 2017 15:25 IST

युट्युब या व्हिडीओ शेअरिंग साईटने इन-अ‍ॅप मॅसेंजर सादर केला असून याच्या माध्यमातून व्हिडीओला शेअर करून त्यावर चॅटींग करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

युट्युब या व्हिडीओ शेअरिंग साईटने इन-अ‍ॅप मॅसेंजर सादर केला असून याच्या माध्यमातून व्हिडीओला शेअर करून त्यावर चॅटींग करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

युट्युब या व्हिडीओ शेअरिंग साईटवर गत काही महिन्यांपासून इन-अ‍ॅप मॅसेंजरची सुविधा प्रयोगात्मक अवस्थेत देण्यात आली होती. आता जगभरातील युजर्सला हे फिचर प्रदान करण्यात आले आहे. यात व्हिडीओ पाहत असतांना त्यावर चर्चा करण्याची आणि त्या व्हिडीओला आपल्या मित्रांसोबत शेअर करण्याची सुविधा देण्यात आली आहे. ही सुविधा अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्रणालींचा वापर करणार्‍यांना मिळाली आहे.

युट्युब मॅसेंजरची सुविधा ही स्वत:चे युट्युब चॅनल असणार्‍या युजर्सला वापरता येणार आहे. या युजर्सनी लॉगीन केल्यावर त्यांना प्रत्येक व्हिडीओच्या खाली शेअर हा पर्याय टॅबच्या स्वरूपात देण्यात आलेला असल्याचे दिसून येईल. यावर क्लिक केल्यावर कुणीही आपले मित्र, कुटुंबिय आदींना कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये अ‍ॅड करू शकतात. या यादीतील लोकांना कोणताही व्हिडीओ शेअर करता येतो. या व्हिडीओबाबत चर्चा करण्यासह इतरांना चर्चेचे आमंत्रणही या माध्यमातून देता येते. तर याच पध्दतीने इतरांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर चॅटींग करण्याची सुविधादेखील या मॅसेंजरमध्ये देण्यात आली आहे.

युट्युब व्हिडीओजवर आधीपासूनच कॉमेंटची सुविधा देण्यात आली आहे. मात्र याच्या मर्यादा लक्षात घेऊन इन-अ‍ॅप मॅसेंजर प्रदान करण्यात आल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या माध्यमातून युट्युब व्हिडीओ पाहतांनाचे एंगेजमेंट वाढून अर्थातच साईटला लाभ होणार आहे. तर या मॅसेंजरच्या रूपाने युट्युबने काळाची पावले ओळखल्याचेही मानले जात आहे. सध्या सोशल साईटच्या तुलनेत मॅसेंजर मोठ्या प्रमाणात लोकप्रियत होत आहेत. यामुळेच युट्युब या व्हिडीओ शेअरिंग साईटने हा मार्ग पत्करल्याची चर्चा आता टेक्नो-वर्ल्डमध्ये सुरू आहे.