शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

युट्युब अ‍ॅपवर येणार डार्क मोडसह अन्य फिचर्स

By sunil.patil | Updated: January 17, 2018 11:17 IST

युट्युब या व्हिडीओ शेअरिंग साईटच्या अ‍ॅपवर लवकरच डार्क मोडसह अन्य फिचर्स देण्यात येणार असून आगामी अपडेटमध्ये याचा समावेश करण्यात येणार आहे.

युट्युब या व्हिडीओ शेअरिंग साईटच्या अ‍ॅपवर लवकरच डार्क मोडसह अन्य फिचर्स देण्यात येणार असून आगामी अपडेटमध्ये याचा समावेश करण्यात येणार आहे. गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात युट्युब साईटचा कायापालट करण्यात आला होता. यात अगदी युट्युब लोगोतील बदलासह या साईटला मटेरियल डिझाईन प्रदान करण्यात आले होते. यासोबत डार्क मोड हे विशेष फिचर देण्यात आले होते. याच्या अंतर्गत कुणीही युजर युट्युब साईटवरील व्हिडीआ बघतांना पार्श्‍वभागाला गडद काळ्या रंगात बदलू शकतो. विशेष करून रात्री याचा वापर केल्यास डोळ्यांना कमी त्रास होत असल्याचे युट्युब साईटतर्फे जाहीर करण्यात आले होते. अर्थात ही सुविधा आजवर फक्त संगणकावरून युट्युब वापरणार्‍यांनाच देण्यात आली होती. आता मात्र स्मार्टफोनच्या युजर्सलाही याचा वापर करता येणार आहे. कारण काही युजर्सला हे फिचर दिसू लागले आहे. यामुळे याची चाचणी सुरू असून आगामी काळात अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्रणालींच्या युजर्सला ही सुविधा अपडेटच्या माध्यमातून देण्यात येणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. युट्युब अ‍ॅपवर याच्या जोडीला लवकरच इन्कॉग्निटो मोड देखील देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या अ‍ॅपच्या सोर्स कोडमध्ये डार्क थीमसह इन्कॉग्निटो मोडची सुविधादेखील दिसून आली आहे.  खरं तर युट्युब वापरणार्‍यांना आधीच आपली सर्च आणि वॉच हिस्ट्री पॉज करण्याची सुविधा दिलेली आहे. मात्र यासाठी सेटींगमध्ये बदल करावा लागतो. तथापि, इन्कॉग्निटो मोडसाठी एक स्वतंत्र आयकॉन देण्यात येणार असून यावर क्लिक करून कुणीही आपल्या वॉच/सर्च हिस्ट्रीला पॉज करून अज्ञात पध्दतीत युट्यु साईटवर मुशाफिरी करू शकतो. तसेच नवीन आवृत्तीत कुणीही युजर स्वाईप करून युट्युब साईटवरील जाहिरातींना टाळू शकतो. युट्युब अ‍ॅपच्या आगामी अपडेटमध्ये हे सर्व फिचर्स मिळू शकतात असे मानले जात आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानYouTubeयु ट्यूब