शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

तुमचा स्मार्टफोन हॅकर्सच्या निशाण्यावर; आयटी मंत्रालयाच्या इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमकडून इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 06:03 IST

अँड्रॉईड १०, अँड्रॉईड ११ आणि अँड्रॉईड १२ ऑपरेटिंग सिस्टीम वापरकर्त्यांना यात खासकरून सावध राहण्यास सांगण्यात आले आहे. फोन हॅक करून सर्व संदेश वाचले जातात. शिवाय बँकिंग संबंधित सर्व माहिती काढून फसवणूक केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क : देशातील कोट्यवधी अँड्रॉइड स्मार्टफोन वापरकर्त्यांना देशाच्या आयटी मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने इशारा दिला आहे. अँड्रॉईड १०, अँड्रॉईड ११ आणि अँड्रॉईड १२ ऑपरेटिंग सिस्टीम वापरकर्त्यांना यात खासकरून सावध राहण्यास सांगण्यात आले आहे. फोन हॅक करून सर्व संदेश वाचले जातात. शिवाय बँकिंग संबंधित सर्व माहिती काढून फसवणूक केली जात आहे.सुरक्षेत राहिल्या त्रुटीअँड्रॉईडची प्रणाली, रनटाईम, फोनमधील महत्त्वाचे घटक यांच्यामध्ये सुरक्षेसंबंधित त्रुटी राहिल्याने फोन हॅक करण्यात येत आहेत. स्मार्टफोनमधील अतिशय महत्त्वाची माहिती हॅकर्स अगदी आरामात काढून घेत तुमच्या बँक खात्यातील पैशांवर डल्ला मारू शकतात.  त्यामुळे प्रत्येक वेळी फोन हॅक झाला नाही ना याची काळजी घेणे आवश्यक आहे.सुरक्षाकवच अपुरेगुगल आणि अँड्रॉईड ओएसने धोके अगोदरच स्पष्ट करत सुरक्षा उपाययोजना सुरू केल्या आहेत. मात्र, त्या पुरेशा ठरल्या नाहीत. गुगलच्या सुरक्षाकवचने ५ मार्च २०२२ पर्यंत हँकर्सपासून स्मार्टफोनला दूर ठेवले आहे.कंपनीच्या मते, सर्व सुरक्षाकवचांना भेदून हॅकर्स फोनमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे अशा फसवणूक प्रकरणांमध्ये आणखी वाढ होऊ शकते. गुगल क्रोम वापरणाऱ्यांना अलर्टफोनवरून गुगल क्रोम वापरणाऱ्यांनाही सरकारने अलर्ट दिला आहे : जे गुगल क्रोम वापरतात त्यांना अचानक पासवर्ड आणि इतर माहिती मागितली जाऊ शकते. त्यामुळे प्रत्येकवेळी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.