शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

शाओमी मी मॅक्स-२च्या मूल्यात घट, ट्विटरद्वारे दिली माहिती

By शेखर पाटील | Updated: October 31, 2017 12:56 IST

शाओमी कंपनीने आपल्या मी मॅक्स २ या स्मार्टफोनच्या दोन्ही व्हेरियंटच्या मूल्यात प्रत्येकी एक हजार रूपये इतकी घट केल्याचे जाहीर केले आहे

ठळक मुद्देशाओमी कंपनीने आपल्या मी मॅक्स २ या स्मार्टफोनच्या दोन्ही व्हेरियंटच्या मूल्यात प्रत्येकी एक हजार रूपयांची घट केली आहेशाओमी कंपनीने जुलै महिन्यात शाओमी मी मॅक्स २ हा स्मार्टफोन लाँच केला होताआता ६४ जीबी व्हेरियंट १५,९९९ तर ३२ जीबी व्हेरियंट १३,९९९ रूपये मूल्यात ग्राहकांना सादर करण्यात आले आहे

मुंबई - शाओमी कंपनीने आपल्या मी मॅक्स २ या स्मार्टफोनच्या दोन्ही व्हेरियंटच्या मूल्यात प्रत्येकी एक हजार रूपये इतकी घट केल्याचे जाहीर केले आहे. शाओमी कंपनीने जुलै महिन्यात शाओमी मी मॅक्स २ हा स्मार्टफोन लाँच केला होता. यानंतर सप्टेंबर महिन्यात याची ३२ जीबी स्टोअरेजची दुसरी आवृत्ती सादर करण्यात आली होती. सध्या ६४ जीबी स्टोअरेजयुक्त मी मॅक्स २ हा स्मार्टफोन १६,९९९ तर ३२ जीबी स्टोअरेजचे मॉडेल १४,९९९ रूपयात ग्राहकांना मिळत आहे. आता ६४ जीबी व्हेरियंट १५,९९९ तर ३२ जीबी व्हेरियंट १३,९९९ रूपये मूल्यात ग्राहकांना सादर करण्यात आले आहे. मूल्यातील ही घट कायमसाठीच करण्यात आल्याचे शाओमी कंपनीचे भारतीय विभागाचे प्रमुख मनुकुमार जैन यांनी एका ट्विटद्वारे जाहीर केले आहे.

 

फिचर्स शाओमी मी मॅक्स २ मध्ये ६.४४ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी म्हणजेच १९२० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले असून यावर कॉर्निंग गोरीला ग्लास ३ चे संरक्षक आवरण असेल. यात ऑक्टा-कोअर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६३५ प्रोसेसर आहे. याची रॅम चार जीबी आणि अंतर्गत स्टोअरेज ६४ असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा असेल. यामध्ये क्विकचार्ज ३.० या तंत्रज्ञानाचा सपोर्ट असणारी तब्बल ५,३०० मिलीअँपिअर क्षमतेची जंबो बॅटरी देण्यात आली आहे. 

शाओमी मी मॅक्स २ या मॉडेलमध्ये सोनी आयएमएक्स ३८६ या इमेज प्रोसेसरने युक्त असणारा १२ मेगापिक्सल्सचा मुख्य कॅमेरा असून याच्या मदतीने फोर-के क्षमतेचे व्हिडीओ चित्रीकरण करता येईल. तर यात ५ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या मार्शमॅलो या आवृत्तीवर आधारित एमआययुआय या प्रणालीवर चालणारा आहे.   

टॅग्स :xiaomiशाओमीMobileमोबाइल