शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

लवकरच येणार शाओमीचा गेमिंग स्पेशल स्मार्टफोन

By शेखर पाटील | Updated: February 23, 2018 13:35 IST

शाओमी कंपनी लवकरच ब्लॅक शार्क या नावाने स्मार्टफोन लाँच करणार असून हे मॉडेल खास गेमर्ससाठी सादर करण्यात येणार असल्याची माहिती या मॉडेलच्या लिस्टींगमधून समोर आली आहे.

शाओमी कंपनी लवकरच ब्लॅक शार्क या नावाने स्मार्टफोन लाँच करणार असून हे मॉडेल खास गेमर्ससाठी सादर करण्यात येणार असल्याची माहिती या मॉडेलच्या लिस्टींगमधून समोर आली आहे.

स्मार्टफोनवर गेम खेळणार्‍यांची संख्या लक्षणीय आहे. यामुळे स्मार्टफोनवर गेमिंच्या उत्तम अनुभुतीसाठी विविध फिचर्स देण्याला बहुतांश कंपन्या प्राधान्य देत आहेत. तर अलीकडेच रेझर या कंपनीने खास गेमर्ससाठी स्मार्टफोन लाँच केला आहे. या अनुषंगाने शाओमी कंपनीची मालकी असणार्‍या ब्लॅक शार्क या उपकंपनीने याच प्रकारातील स्मार्टफोन लाँच करण्याचे संकेत दिले आहेत. चीनमधील अनतूतू या बेंचमार्कींग करणार्‍या संकेतस्थळावर याच्या सर्व फिचर्सची माहिती लिस्टींग करण्यात आली आहे. यानुसार या स्मार्टफोनमध्ये १८:९ अस्पेक्ट रेशो असणारा आणि फुल एचडी प्लस म्हणजेच १०८० बाय २१६० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले असेल. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ८४५ प्रोसेसर असेल. तर याची रॅम ८ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असेल असे या लिस्टींगमध्ये नमूद करण्यात आले आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ओरिओ या अद्ययावत आवृत्तीवर चालणारा असून यावर शाओमीची मीयुआय हा युजर इंटरफेस असेल.

कोणत्याही गेमिंग स्मार्टफोनमध्ये उत्तम दर्जाचा ग्राफीक प्रोसेसर आणि अंतर्गत कुलींग प्रणाली आवश्यक असते. या अनुषंगाने शाओमीच्या या आगामी स्मार्टफोनमध्येही या बाबी निश्‍चितपणे असतील. तथापि, अनतूतू या साईटवरील लिस्टींगमध्ये याची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र या बेंचमार्कींग संकेतस्थळावर शाओमीच्या ब्लॅकशार्क या आगामी स्मार्टफोनला सॅमसंगच्या आगामी गॅलेक्सी एस ९ या मॉडेलपेक्षा जास्त स्कोअरींग देण्यात आले आहे. अर्थात यातील सर्व फिचर्स हे दर्जेदार असतील हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांमध्ये या स्मार्टफोला लाँच करण्यात येईल असे मानले जात आहे. 

टॅग्स :xiaomiशाओमी