शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

ढासू प्रोसेसरसह Redmi 10 Prime येणार भारतात; पुढील आठवड्यात लाँच इव्हेंटचे आयोजन 

By सिद्धेश जाधव | Updated: August 27, 2021 19:05 IST

Redmi 10 Prime Launch: शाओमी Redmi 10 Prime स्मार्टफोन ‘ऑल राउंड सुपरस्टार’ टॅगलाईनसह सादर करणार आहे.

शाओमीने आगामी Redmi 10 Prime स्मार्टफोनमधील चिपसेट अधिकृतपणे माहिती दिली आहे. हा स्मार्टफोन MediaTek Helio G88 चिपसेटसह लाँच केला जाईल, असे कंपनीने ट्वीट करून स्पष्ट केले आहे. आतापर्यंत फक्त अंदाज बांधले जात होते. हा चिपसेट नुकताच मीडियाटेकने सादर केला होता, हा एक गेमिंग चिपसेट आहे. शाओमी Redmi 10 Prime स्मार्टफोन ‘ऑल राउंड सुपरस्टार’ टॅगलाईनसह सादर करणार आहे.  

Redmi 10 Prime ची भारतातील संभाव्य किंमत 

रेडमी सीरिजमधील स्मार्टफोनची किंमत नेहमीच Redmi Note सीरिज पेक्षा कमी असते. त्यामुळे Xiaomi Redmi 10 Prime स्मार्टफोन Redmi Note 10 पेक्षा कमी किंमतीत सादर केला जाईल. Redmi Note 10 सध्या भारतात 13,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे Redmi 10 Prime स्मार्टफोनची किंमत यापेक्षा कमीच असू शकते. 

Redmi 10 Prime चे स्पेसिफिकेशन्स  

Xiaomi Redmi 10 Prime स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. पंच होल कट-आऊटसह येणार हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट आणि 20:9 अस्पेक्ट रेशियोला सपोर्ट करतो. या डिस्प्लेला गोरिल्ला ग्लास 3 ची सुरक्षा देण्यात आली आहे. सिक्योरिटीसाठी यात उजव्या पॅनलवर पावर बटनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तसेच यात ड्युअल 4G VoLTE, Wi-Fi 5, Bluetooth 5.0, GPS, IR blaster, Qj 3.5mm ऑडियो जॅक असे कनेक्टिव्हिटी ऑप्शन देण्यात आले आहेत.   

लाँच पूर्वी शाओमीने सांगितल्याप्रमाणे या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेकचा Helio G88 चिपसेट देण्यात आला आहे. हा एक गेमिंग चिपसेट आहे असे कंपनीने म्हटले होते. या रेडमी फोनमध्ये 6GB पर्यंतचा LPDDR4x RAM आणि 128GB पर्यंतची eMMC स्टोरेज देण्यात आली आहे. हा बजेट स्मार्टफोन Android 11 ऑपरेटिंग सिस्टम आधारित MIUI 12.5 वर चालतो.  

Xiaomi Redmi 10 Prime 10 मध्ये कंपनीने क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे, त्याचबरोबर 8-मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड लेन्स, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर कॅमेरा मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. या रेडमी नव्या फोनमधील 5,000mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.   

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड