शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

Xiaomi ने सादर केली भन्नाट मिनी वॉशिंग मशीन; हाय टेम्परेचर बॉईल वॉश करणार जिवाणूंची सुट्टी

By सिद्धेश जाधव | Updated: September 28, 2021 19:09 IST

Xiaomi ने आपली कॉम्पॅक्ट वॉशिंग मशीन Washing Machine Mini 16 वॉशिंग मोडसह सादर केली आहे.

शाओमीने Mijia Washing Machine Mini चीनमध्ये सादर केली आहे. ही एक कॉम्पॅक्ट आणि पोर्टबल वॉशिंग मशीन आहे. तसेच कंपनीने सादर केलेली आतापर्यंतची सर्वात छोटी वॉशिंग मशीन आहे. घरापासून दूर राहणाऱ्या आणि एकट्याने राहणाऱ्या तरुण-तरुणांसाठी कंपनीने या मशीनची निर्मिती केली आहे, तसेच लहान मुलांच्या कपड्यांसाठी देखील हा योग्य पर्याय ठरू शकतो. 

Mijia Washing Machine Mini ची किंमत 

Mijia Washing Machine Mini चीनमध्ये 1,099 चीनी युआन (सुमारे 12,600 रुपये) मध्ये सादर करण्यात आली आहे. 1ऑक्टोबरला सकाळी 10 वाजल्यापासून Xiaomi Mall, Xiaomi Youpin, JD.com, Tmall इत्यादी ऑनलाईन पोर्टल्सवरून विकत घेता येईल. ही मशीन कंपनी भारतात सादर करणार आहे कि नाही याची माहिती मात्र मिळाली नाही. 

Mijia Washing Machine Mini ची वैशिष्ट्ये 

Mijia Washing Machine Mini ची सर्वात मोठी खासियत म्हणजे यातील हाय टेम्परेचर बॉईल बॉइल-वॉश फिचर आहे. या मोडमध्ये जिवाणूंचा नाश करण्यासाठी 90 डिग्री सेल्सियस, डाग घालवण्यासाठी 40 डिग्री सेल्सियस, रूम टेम्परेचर आणि 60 डिग्री सेल्सियस असे चार लेव्हल देण्यात आल्या आहेत. म्हणून ही मशीन नवजात बाळांचे कपडे धुण्यासाठी योग्य ठरू शकते, असे कंपनीने म्हटले आहे. 

मशीनची लोडिंग क्षमता मात्र फक्त 1 किलोग्राम आहे. यात 16 खास वॉशिंग मोड्स देण्यात आले आहेत, ज्यात 10 स्टेन वॉश प्रोसेसचा समावेश आहे. ही स्मार्ट वाशिंग मशीन मोबाईलला कनेक्ट करून एका अ‍ॅपच्या माध्यमातून कंट्रोल देखील करता येते.  

टॅग्स :xiaomiशाओमी