शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
3
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
4
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
5
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
6
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
7
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
8
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
9
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
10
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
11
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
12
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
13
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
14
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
15
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
16
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
17
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
18
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
19
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
20
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

अंडर डिस्प्ले सेल्फी कॅमेरा असलेला Mi MIX 4 या दिवशी होणार लाँच; फ्लॅगशिप प्रोसेसरसह येणार बाजारात 

By सिद्धेश जाधव | Updated: August 4, 2021 18:27 IST

Mi MIX 4 Launch Date: Mi MIX 4 स्मार्टफोन 10 ऑगस्टला संध्याकाळी 7:30 वाजता लाँच केला जाईल. हा शाओमीचा पहिला स्मार्टफोन असेल जो अंडर डिस्प्ले सेल्फी कॅमेऱ्यासह लाँच केला जाईल.

ठळक मुद्देMi MIX 4 स्मार्टफोन 10 ऑगस्टला संध्याकाळी 7:30 वाजता लाँच केला जाईलहा शाओमीचा पहिला स्मार्टफोन असेल जो अंडर डिस्प्ले सेल्फी कॅमेऱ्यासह लाँच केला जाईल.

Xiaomi चा आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन Mi MIX 4 गेले काही दिवस चर्चेचा विषय ठरला आहे. या स्मार्टफोनचे लीक झालेले स्पेसिफिकेशन पाहून शाओमीचे चाहते या फोनच्या लाँचची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता Xiaomi ने चिनी सोशल नेटवर्क विबोवर पोस्ट करून सांगितले आहे कि, Mi MIX 4 स्मार्टफोन 10 ऑगस्टला संध्याकाळी 7:30 वाजता (स्थानिक वेळेनुसार) लाँच केला जाईल. हा शाओमीचा पहिला स्मार्टफोन असेल जो अंडर डिस्प्ले सेल्फी कॅमेऱ्यासह लाँच केला जाईल. या स्मार्टफोनसोबत Mi CC11 series, Mi Pad 5 lineup आणि MIUI 13 ची घोषणा होण्याची अपेक्षा आहे.  

Xiaomi Mi MIX 4 चे संभाव्य स्पेसिफिकेशन 

Mi MIX 4 मध्ये 6.67-इंचचाचा फुल एचडी+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हा एक अ‍ॅमोलेड कर्व डिस्प्ले असेल जो दोन बाजूंना असलेल्या कर्वसह सादर केला जाईल. शाओमी या स्मार्टफोनमध्ये शक्तिशाली फ्लॅगशिप प्रोसेसर देऊ शकते. रिपोर्ट्सनुसार हा स्मार्टफोन क्वालकॉमच्या Snapdragon 888+ चिपसेटसह सादर केला जाईल. हा एक 5G फोन असू शकतो. या स्मार्टफोनमध्ये 12GB पर्यंतचा लेस्टस्ट LPDDR5 रॅम  आणि 256GB पर्यंतची फास्ट UFS 3.1 स्टोरेज दिली जाऊ शकते.  

Mi MIX 4 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. यातील मुख्य कॅमेऱ्याची माहिती मिळाली आहे, परंतु इतर दोन सेन्सर अजून गुलदस्त्यात आहेत. या फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा सेन्सर दिला जाईल. या शाओमी स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी 120W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 70W किंवा 80W वायरलेस चार्जिंगसह देण्यात येईल. Mi MIX 4 स्मार्टफोन चीनमध्ये 6,000 RMB (अंदाजे 70,000 रुपये) मध्ये लाँच केला जाऊ शकतो.  

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोन