शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
5
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
6
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
7
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
8
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
9
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
10
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
11
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
12
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
13
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
14
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
15
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
16
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
17
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
18
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
19
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
20
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू

Xiaomi Mi 11 launched: 108 मेगापिक्सेल कॅमेरा, 4,600mAh ची दमदार बॅटरी; पाहा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

By जयदीप दाभोळकर | Updated: February 8, 2021 21:14 IST

Xiaomi mi 11 launch: Xiaomi ने सोमवारी Mi 11 ग्लोबली केला लाँच

ठळक मुद्देनव्या क्वालकॉम प्रोसेसरचा करण्यात आला आहे वापरदमदार स्पेसिफिकेशन्ससह फ्लॅगशिप स्मार्टफोन झाला लाँच

Xiaomi नं सोमवारी आपला Mi 11 हा स्मार्टफोन ग्लोबली लाँच केला. Mi 11 हा फ्लॅगशिप स्मार्टफोन गेल्या डिसेंबर महिन्याच्या अखेरिस चीनमध्ये सादर करण्यात आला होता. या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 888 SoC हा नवा प्रोसेसर देण्यात आला असून पंचहोल डिझाईनही आहे. याव्यतिरिक्त फोनमध्ये 256GB पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेजही देण्यातआलं आहे. Mi 11 च्या 8GB + 128GB स्टोरेजची किंमत 749 युरो म्हणजेच जवळपास 65,800 रूपये इतकी आहे. तर दुसरीकडे 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 799 युरो म्हणजेच जवळपास 70,100 रुपये इतकी आहे. हा फोन व्हाईट, ब्लू आणि मिडनाईट ग्रे या कलर्समध्ये उपलब्ध आहे. Mi 11 मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 108 मेगापिक्सेलचा असून f/1.85 च्या सोबत येतो. याव्यतिरिक्त यासोबत 13 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलची मायक्रो लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 20 मेगापिक्सेलचा फ्रन्ट कॅमेरा देण्यात आला आहे.काय आहेत स्पेसिफिकेशनMi 11 ड्युअल सिम (नॅनो) सह येतो. याव्यतिरिक्त यामध्ये 6.81 इंचाचा 2K WQHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला असून तो 120Hz च्या रिफ्रेश रेटसह येतो. स्मार्टफोनमध्ये क्वॉलकमचा नवा स्नॅपड्रॅगन 888 SoC प्रोसेसर देण्यात आला आहे. याशिवाय स्मार्टफोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरदेखील देण्यात आला आहे. शिवाय यात कॉर्निंग ग्लास विक्टस प्रोटेक्शनदेखील आहे. या फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये अँड्रॉईड 10 ऑपरेटिंग सिस्टम सोबतच MIUI 12 आहे. हा स्मार्टफोन 128 आणि 256 जीबी रॅम मेमरीसह येतो.अंडर डिस्प्ले कॅमेरा, क्वाड कर्व्ह्ड वॉटरफॉल स्क्रिन; पाहा Xiaomi चा जबरदस्त स्मार्टफोन

Mi 11 मध्ये कनेक्टिव्हिटीचे 5G (Sub-6 GHz नेटवर्क्स), Wi-Fi 6E, 4G LTE, Infrared (IR), Bluetooth 5.2, NFC आणि अन्य पर्यायही देण्यात आले आहेत. फोनमध्ये असलेला इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर हार्ट रेट मॉनिटरप्रमाणेही काम करतो. या स्मार्टफोनमध्ये 4,600mAh ची बॅटरी देण्यात आली असून तो Mi TurboCharge 55W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंगलाही सपोर्ट करतो.

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोन