शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

लाँच होण्याआधीच Xiaomi Mi 11 Lite NE भारतीय साईटवर लिस्ट; लवकरच सादर होण्याची शक्यता 

By सिद्धेश जाधव | Updated: August 4, 2021 12:32 IST

Xiaomi Mi 11 Lite NE India launch: Xiaomi Mi 11 Lite NE अलीकडेच सादर झालेल्या Mi 11 Lite चा 5G व्हर्जन असल्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.  

चीनी स्मार्टफोन निर्माता Xiaomi ने गेल्या महिन्यात भारतात Xiaomi Mi 11 Lite स्मार्टफोन लाँच केला होता. आता या फोनचा अजून एक व्हर्जन भारतात सादर करण्याची तयारी कंपनी करत असल्याचे दिसत आहे. हा स्मार्टफोन Xiaomi Mi 11 Lite NE नावाने भारतीय बाजारपेठेत दाखल होऊ शकतो. लाँचपूर्वी हा स्मार्टफोन ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सच्या वेबसाईटवर लिस्ट झाला आहे. त्यामुळे हा फोन लवकरच भारतात सादर होण्याची शक्यता वाढली आहे.  

Xiaomi Mi 11 Lite NE स्मार्टफोन मॉडेल नंबर – 2109119DG सह इन्फोकॉम मीडिया डेवलपमेंट अथॉरिटी या सिंगापूरच्या वेबसाईटवर दिसला होता. त्याआधीच या मॉडेलला बीआयएस कडून सर्टिफिकेशन मिळाले आहे. हा स्मार्टफोन भारतात सप्टेंबरमध्ये लाँच केला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. Xiaomi Mi 11 Lite NE अलीकडेच सादर झालेल्या Mi 11 Lite चा 5G व्हर्जन असल्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.  

Mi 11 Lite 5G चे स्पेसिफिकेशन्स  

Mi 11 Lite 5G जागतिक बाजारात लाँच झाला आहे, त्यामुळे या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.55-इंचाचा फुल एचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. Mi 11 Lite 5G स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 780 SoC सह येणार जगातील पहिला स्मार्टफोन आहे. यात 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.  

Xiaomi Mi 11 Lite 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. फोनच्या मागे एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेन्सर देण्यात आला आहे, त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 5 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स मिळते. हा फोन 20 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोनमध्ये कंपनीने 4,250mAh ची बॅटरी दिली आहे.  

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड