शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
3
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
4
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
5
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
6
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
7
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
8
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
9
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
10
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
11
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
12
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
13
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
14
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
15
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
16
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
17
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
18
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
19
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
20
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!

अरे व्वा! YouTube च्या अ‍ॅडपासून सुटका, कसं मिळवाल Premium Subscription तेही मोफत? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 15:47 IST

यूट्यूब या लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मवर तुम्ही जेव्हा एखादा व्हिडिओ पाहत असता तेव्हा येणाऱ्या अ‍ॅडमुळे तुम्हीही वैतगता का? मग आता एक खूशखबर आहे.

नवी दिल्ली-

यूट्यूब या लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मवर तुम्ही जेव्हा एखादा व्हिडिओ पाहत असता तेव्हा येणाऱ्या अ‍ॅडमुळे तुम्हीही वैतगता का? मग आता एक खूशखबर आहे. यूट्यूबवर दिसणाऱ्या अ‍ॅड्सपासून तुम्ही स्वत:ची सुटका करून घेऊ शकता. शाओमी इंडियानं यूट्यूबसोबत एक अनोखा करार केला आहे. या करारानुसार शाओमीच्या काही स्मार्टफोन्समध्ये ग्राहकांना तीन महिन्यासाठी मोफत यूट्यूब प्रीमिअम मेंबरशिप देण्यात येणार आहे. 

"आमच्या ग्राहकांना अ‍ॅड फ्री कन्टेंट आणि ऑफलाइन कंन्टेंट उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशातून पात्र ग्राहकांना तीन महिन्यांसाठी मोफत यूट्यूब प्रीमिअमचं सब्सक्रिप्शन देण्यात येणार आहे", असं शाओमी इंडियानं जाहीर केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. YouTube Premium हा व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मचा एक प्रीमियम पर्याय आहे ज्यातून युझर्सना जाहिरात-मुक्त स्ट्रीमिंग आणि ऑफलाइन डाउनलोड्सची सुविधा उपलब्ध होते. तसंच प्रीमिअर सब्सक्रिप्शनच्या माध्यमातून युझर्सना जाहिरात मुक्त म्युझिक ऐकण्याचीही सुविधा प्राप्त होते. 

शाओमीच्या पुढील स्मार्टफोन्सचे ग्राहक तीन महिन्याच्या मोफत यूट्यूब प्रीमिअमचा लाभ घेऊ शकणार आहेत. यात Xiaomi 12 Pro, Xiaomi 11i, Xiaomi 11i HyperCharge and Xiaomi 11T यांचा समावेश आहे. हे स्मार्टफोन ज्यांच्याकडे आहेत त्यांना तीन महिन्यांसाठी यूट्यूब प्रीमिअम सबस्क्रिप्शन वापरता येणार आहे. दरम्यान Redmi Note 11, Note 11S, Note 11 Pro, Note 11 Pro+ आणि Xiaomi Pad 5 यूझर्सना दोन महिन्यांसाठी प्रीमिअम सबस्क्रिप्शन वापरता येणार आहे. 

शाओमी इंडियाकडून उपलब्ध करुन देण्यात आलेलं हे खास प्रमोशन ३१ जानेवारी २०२३ पर्यंतच सुरू असणार आहे. तर प्रमोशन कालावधी संपल्यानंतरही यूट्यूब प्रीमिअम सबस्क्रिब्शन हवं असेल तर दरमहा १२९ रुपये युझर्सना भरावे लागणार आहेत.

टॅग्स :YouTubeयु ट्यूबtechnologyतंत्रज्ञान