शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
9
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
10
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
11
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
12
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
13
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
14
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
15
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
16
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
17
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
18
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
19
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
20
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
Daily Top 2Weekly Top 5

OnePlus 10 Pro येताच Xiaomi लागली तयारीला; सर्वात वेगवान प्रोसेसर असलेल्या स्मार्टफोनच्या लाँचची केली घोषणा

By सिद्धेश जाधव | Updated: April 1, 2022 15:00 IST

Xiaomi 12 Pro स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच केला जाईल. OnePlus चा सर्वात वेगवान स्मार्टफोन देशात आल्यानंतर कंपनीनं ही घोषणा केली आहे.  

काल गुरुवारी 31 मार्च 2022 रोजी वनप्लसनं भारतात आपला सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन OnePlus 10 Pro  सादर केला. हा डिवाइस सॅमसंगच्या Galaxy S22 सीरिजला टक्कर देईल. परंतु शाओमीकडे सध्या या तोडीचा मोबाईल उपलब्ध नाही. म्हणून कंपनीनं Xiaomi 12 Pro च्या लाँचची घोषणा वनप्लसच्या लाँच इव्हेंटच्या आधी केली आहे. येत्या 12 एप्रिलला Xiaomi 12 सीरिजमधील सर्वात दमदार स्मार्टफोन भारतात येईल. या सीरिजमधील Xiaomi 12आणि Xiaomi 12X येणार की नाही, हे मात्र समजलं नाही. 

Xiaomi 12 Pro चे स्पेसिफिकेशन्स  

शाओमी 12 प्रो स्मार्टफोनमधील डिस्प्ले देखील शानदार आहे. यात 3200 × 1440 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.73 इंचाचा 2के डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 480 हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. हा ई5 अ‍ॅमोलेड एलटीपीओ पॅनल इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि कोर्निंग गोरिल्ला विक्टसच्या सुरक्षेसह बाजारात आला आहे. हा फोन 10बिट कलर आणि 1500निट्स ब्राईटनेसला सपोर्ट करतो.  

Xiaomi 12 Pro लेटेस्ट अँड्रॉइड 12 ओएसवर आधारित नव्या कोऱ्या मीयुआय 13 वर चालतो. 3 गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टकोर प्रोसेसरसह 4 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 चिपसेट या शाओमी 12 प्रो चा सर्वात मोठा आकर्षण बिंदू आहे. हा फोन 12 जीबी पर्यंतच्या रॅम आणि 256 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो.  

पावर बॅकअपसाठी Xiaomi 12 Pro मध्ये 4,600एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. यातील 120वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला हा फोन मिनिटांत फुल चार्ज करेल. हा फोन फक्त 15 मिनिटांत 0 ते 100 टक्के पर्यंत चार्ज होईल, असा दावा कंपनीनं केला आहे. तसेच हा डिवाइस 50वॉट वायरलेस चार्जिंग आणि 10वॉट रिवर्स वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट करतो. 

फोटोग्राफीसाठी शाओमी 12 प्रो मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यात 50 मेगापिक्सल सोनी आईएमएक्स707 7पी लेन्स मुख्य सेन्सरचे काम करते. सोबत 50 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स आणि 50 मेगापिक्सलचाची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स देण्यात आली आहे. हा फोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. 

टॅग्स :xiaomiशाओमीMobileमोबाइलSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड