शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

लाँचपूर्वीच शक्तिशाली Xiaomi 12 हे फोटोज आले समोर; देणार का सॅमसंगच्या अल्ट्रा प्रीमियम फोन्सना मात?

By सिद्धेश जाधव | Updated: November 1, 2021 12:49 IST

Xiaomi 12 India Launch: Xiaomi 12 स्मार्टफोनच्या इमेजेस चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वर शेयर करण्यात आल्या आहेत. या फोटोजमधून या फोनच्या डिजाईन आणि लूकची माहिती मिळाली आहे.  

गेल्या आठवड्यात शाओमीने भारतातात पॉवरफुल Mi 11 Ultra ची विक्री बंद केली आहे. आता या फोनची जागा आगामी फ्लॅगशिप Xiaomi 12 स्मार्टफोन घेणार आहे. आता या फोनच्या इमेजेस चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वर शेयर करण्यात आल्या आहेत. या फोटोजमधून या फोनच्या डिजाईन आणि लूकची माहिती मिळाली आहे.  

कथित Xiaomi 12 स्मार्टफोन एका प्रोटेक्टिव्ह केसमध्ये दिसत आहे. हा आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन कर्व डिस्प्ले, पंच होल सेल्फी कॅमेऱ्यासह सादर केला जाईल. या फोटोजमुळे हा फ्लॅगशिप स्मार्टफोनचा लाँच नजीक असल्याचा अंदाज लावला जात आहे. याआधी हा शाओमी फोन यावर्षी डिसेंबरपर्यंत लाँच केला जाऊ शकतो, असे सांगण्यात आले होते.  

Xiaomi 12 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स  

लिक्स आणि रिपोर्ट्समधून Xiaomi 12 ची माहिती समोर आली आहे. त्यानुसार या फोनमध्ये LTPO डिस्प्ले अ‍ॅडेप्टिव रिफ्रेश रेटसह देण्यात येईल. यात Qualcomm Snapdragon 898 चिपसेट मिळेल. त्याचबरोबर 12GB पर्यंतचा LPDDR5x RAM आणि 512GB पर्यंतची UFS 3.1 स्टोरेज देण्यात येईल. हा मोबाईल Android 12 आधारित MIUI वर चालेल. तसेच यातील 5000mAh ची बॅटरी 120W वायर्ड आणि 50W वायरलेस फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.   

मिळलेल्या दिलेल्या माहितीनुसार आगामी Xiaomi फ्लॅगशिप सीरीजमध्ये 50MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. या फोनमध्ये प्रायमरी कॅमेरा 50MP चा असेल. त्याचबरोबर 50MP चा अल्ट्रावाईड सेन्सर आणि 50 मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा दिला जाऊ शकतो. हे सेन्सर ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशनसह येतील. तसेच यात 1920fps स्लो मोशन व्हिडीओ शूट करण्याचा पर्याय मिळेल.   

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान