शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

108MP कॅमेरा, मिनिटांत चार्ज होणारा Xiaomi 11T Pro 5G लाँच; पहिल्याच सेलमध्ये मिळवा हजारोंची सूट

By सिद्धेश जाधव | Updated: January 19, 2022 15:19 IST

Xiaomi 11T Pro Price In India: हा फोन 12 GB RAM, Snapdragon 888, 5000mAh बॅटरी, 120W फास्ट चार्जिंग, 120Hz रिफ्रेश रेट, हरमन कार्डन स्पिकर आणि डॉल्बी अ‍ॅटमॉस सपोर्ट अशा फीचर्ससह बाजारात आला आहे.  

Xiaomi 11T Pro 5G गेले कित्येक दिवस चर्चेत राहिल्यानंतर अखेरीस भारतात लाँच झाला आहे. शाओमीनं या स्मार्टफोनची किंमत कमी ठेवली आहे. त्यामुळे या महिन्यात आलेल्या Samsung Galaxy S21 FE आणि OnePlus 9RT ला हा एक दमदार पर्याय ठरू शकतो. हा फोन Snapdragon 888, 5000mAh बॅटरी, 120W फास्ट चार्जिंग, 120Hz रिफ्रेश रेट, हरमन कार्डन स्पिकर आणि डॉल्बी अ‍ॅटमॉस सपोर्ट अशा फीचर्ससह बाजारात आला आहे.  

Xiaomi 11T Pro चे स्पेसिफिकेशन्स     

Xiaomi 11T Pro मध्ये क्वॉलकॉमचा शक्तिशाली Snapdragon 888 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 बेस्ड MIUI 12.5 वर चालतो. शाओमी 11T मध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 20:9 अस्पेक्ट रेश्यो, 480Hz टच रिस्पॉन्स रेट, डॉल्बी विजन आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस लेयरसह 6.67-इंचाचा FHD+ TrueColor डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 12GB रॅम आणि 256GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळते आहे.  

या फोनची खासियत म्हणजे या फोनचा चार्जिंग स्पीड. Xiaomi 11T Pro मधील 5000mAh ची बॅटरी 120W इतक्या जबरदस्त वेगाने चार्ज करता येते. हा फोन फक्त 17 मिनिटांत फुलचार्ज होऊ शकतो. फोनमध्ये देखील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 108MP चा सॅमसंग HM2 मुख्य सेन्सर, 8MP ची 119-डिग्री अल्ट्रा-वाईड-अँगल लेन्स आणि 3x झूमसह 8MP टेलीमॅक्रो सेन्सर आहे. हा 16MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. 

कनेक्टिव्हिटीसाठी यात 5जी, 4जी एलटीई, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.1, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट मिळतो. सोबत या फोनमध्ये डॉल्बी अ‍ॅटमॉससह ड्युअल हार्मन कार्डन स्पिकर देण्यात आले आहेत. सुरक्षेसाठी एक साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील देण्यात आला आहे.  

Xiaomi 11T Pro 5G ची किंमत 

भारतात Xiaomi 11T Pro च्या 8GB रॅम आणि 128GB मॉडेलची किंमत 39,999 रुपयेठेवण्यात आली आहे. तर 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसाठी 41,999 रुपये मोजावे लागतील. फोनचा मोठा 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेल 43,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा स्मार्टफोन Amazon, Mi वेबसाईट आणि Mi Home Studios च्या माध्यमातून विकत घेता येईल. या फोनवर लाँच ऑफर अंतगर्त 5 हजार रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. तसेच जुना फोन एक्सचेंज करून आणखीन 5,000 रुपयांची बचत करता येईल.  

हे देखील वाचा:

आतापर्यंतचा मोठा डिस्काउंट! iPhone 12 Mini वर फ्लिपकार्ट देतंय तगडी सूट; अशी आहे ऑफर

Best Phones Under 10000: सेलची कृपा! बजेट 10 हजार तरीही ढासू स्मार्टफोन हवाय? मग एकदा हे स्मार्टफोन बघाच

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान