शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

भारतात मिळणार एक्सबॉक्स वन एक्स

By शेखर पाटील | Updated: January 5, 2018 14:51 IST

मायक्रोसॉफ्टने आपला एक्सबॉक्स वन एक्स हा गेमिंग कन्सोल भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. यात फोर-के क्षमतेच्या गेमिंगसह अनेक अद्ययावत फिचर्स आहेत.

मायक्रोसॉफ्टने आपला एक्सबॉक्स वन एक्स हा गेमिंग कन्सोल भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. यात फोर-के क्षमतेच्या गेमिंगसह अनेक अद्ययावत फिचर्स आहेत.

मायक्रोसॉफ्ट कंपनीने गत जून महिन्यात इ-३ या वार्षिक गेम फेस्टमध्ये एक्सबॉक्स वन एक्स या गेमिंग कन्सोलची घोषणा केली होती. याला प्रोजेक्ट स्कॉर्पिओ या नावाने विकसित करण्यात आले आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून हे मॉडेल प्रत्यक्षात ग्राहकांना मिळू लागले होते. आजवर भारतीय बाजारपेठेत ग्रे मार्केटमध्ये हा गेमिंग कन्सोल विकला जात होता. तथापि, आता मायक्रोसॉफ्टने याला अधिकृतरित्या लाँच करण्याचे जाहीर केले आहे. यानुसार १५ जानेवारीपासून एक्सबॉक्स वन एक्स हा गेमिंग कन्सोल फ्लिपकार्ट आणि अमेझॉन इंडिया या ई-पोर्टलसह देशभरातील निवडक शॉपीजमधून खरेदी करता येणार आहे. याला भारतीय ग्राहकांसाठी ४४,९९० रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आले आहे.

एक्सबॉक्स वन एक्स हा कन्सोल एक्सबॉक्स आणि एक्सबॉक्स वन या आधीच्या मॉडेल्सची अद्ययावत आवृत्ती आहे. या मॉडेलमध्ये अनेक सरस फिचर्सचा समावेश आहे. यातील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे यात फोर-के क्षमतेच्या आणि ६० फ्रेम्स प्रति-सेकंद इतक्या गतीच्या चित्रीकरणात गेमिंगचा आनंद घेता येणार आहे. आजवर फक्त सोनी कंपनीच्या प्लेस्टेशन ४ या मॉडेलमध्ये अशा प्रकारचा फोर-के सपोर्ट प्रदान करण्यात आला होता. यामुळे एक्सबॉक्स वन एक्स त्या मॉडेलला तगडे आव्हान देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याची रॅम १२ जीबी, बँडविडथ् ३२६ जीबी तर स्टोअरेज तब्बल एक टिबी इतके असेल.  तर कनेक्टिव्हिटीसाठी एचडीएमआय, युएसबी ३.०, इथरनेट, आयआर रिसिव्हर/ब्लास्टर आदींचा समावेश असेल. उच्च ग्राफीक्सने युक्त असणार्‍या गेम्समुळे हा कन्सोल तापू नये म्हणून यात खास व्हेपर-चेंबर कुलींग प्रणाली देण्यात आली आहे. मायक्रोसॉफ्टने खास या मॉडेलसाठी अनेक गेम्सची घोषणा केली आहे. तथापि, आधीच्या अर्थात एक्सबॉक्स वन या मॉडेलवर चालणारे बहुतांश गेम्स यातही खेळता येणार आहे. यामुळे गेमर्सला अतिरिक्त भुर्दंड पडणार नाही.