भारतीय स्टार्टअपने AI क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. India AI Impact Summit मध्ये बंगळुरूस्थित AI इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी Bharat1.AI ने जगातील पहिली ‘AI सिटी’ उभारण्याची घोषणा केली. ही AI सिटी कर्नाटकची राजधानी आणि भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरूमध्ये विकसित केली जाणार आहे. या शहरात AI एजंट्सना रिअल-लाईफ वातावरणात प्रशिक्षण आणि चाचणी देण्यात येईल.
‘B1 AI Superpark’, AI संशोधनाचा केंद्रबिंदू
या AI सिटीचा पहिला टप्पा म्हणून ५ लाख चौरस फूट क्षेत्रफळाचे ‘B1 AI Superpark’ उभारण्यात येणार आहे. हा एक AI रिसर्च आणि इनोव्हेशन कॅम्पस असून, बंगळुरूतील सरजापूरा परिसरात त्याचे बांधकाम होईल. कंपनीनुसार, हा प्रकल्प जगातील पहिला AI सिटी उपक्रम ठरणार आहे.
AI एजंट्सना मिळणार रिअल-लाईफ ट्रेनिंग
या AI सिटीचे वैशिष्ट्य म्हणजे येथे AI मॉडेल्सना प्रत्यक्ष जीवनातील परिस्थितीत प्रशिक्षण दिले जाईल. AI अधिक सक्षम करण्यासाठी या सिटीमध्ये १० हजारांहून अधिक AI संशोधक आणि नवोन्मेषक काम करू शकतील अशी सुविधा असेल. यावर्षीअखेर पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, त्यात AI Superparkचा विकास प्राधान्याने केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सिटी-स्केल वर्ल्ड मॉडेल्सना प्रत्यक्ष परिस्थितीत तपासणे, त्यांची मूलभूत बुद्धिमत्ता, स्ट्रेस टेस्टिंग आदी प्रक्रिया राबवण्यात येणार आहेत.
‘ह्युमॅनिटी-सेंट्रिक’ AI सिटी
Bharat1.AI नुसार, ही AI सिटी मानवकेंद्रित (Humanity-Centric) असेल. येथे AI मॉडेल्सना केवळ कार्यक्षमतेपुरतेच नव्हे, तर मानवी मूल्ये आणि जबाबदारी यांचे प्रशिक्षण दिले जाईल. उच्च दर्जाच्या मल्टी-मोडल डेटासाठी एजेंटिक आणि फिजिकल AI सिस्टीम्ससाठी बहुस्तरीय व्हॅलिडेशन फ्रेमवर्क उभारले जाणार आहे. आधार कार्डप्रमाणेच AI व्हॅलिडेशनसाठी स्वतंत्र प्रणाली विकसित केली जाणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
शैक्षणिक संस्था आणि स्टार्टअप्सचे सहकार्य
B1 Superpark मध्ये देशातील आघाडीच्या शैक्षणिक व संशोधन संस्थांचा सहभाग असेल. यामध्ये IIT कानपूर, SAARC (Safety, Privacy & AI Research Center, IISc), BITS पिलानी, iSPIRT फाउंडेशन, IIT रोपड या संस्थांमधील संशोधक, अभियंते आणि स्टार्टअप्स एकत्र येऊन रोबोटिक्स, ऑटोनॉमस इन्फ्रास्ट्रक्चर, मोबिलिटी आणि ह्युमन-मशीन इंटरॅक्शन यांसारख्या क्षेत्रांतील तंत्रज्ञानाची चाचणी घेणार आहेत.
400 Gbps इंटरनेट, 3 वर्षांत पूर्ण शहर
या AI सिटीचे प्रमुख उद्दिष्ट हाय-डेंसिटी कम्प्युटिंग आणि सिम्युलेशन इकोसिस्टम तयार करणे आहे. येथे 400 Gbps वेगाची इंटरनेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध असेल. संपूर्ण AI सिटी उभारण्यासाठी 36 महिने (3 वर्षे) लागणार असून, पुढील टप्प्यांत Superparkपेक्षा अधिक विस्तार केला जाणार आहे. ही सिटी AI टेस्टबेड म्हणून विकसित केली जाणार आहे.
CEO उमाकांत सोनी यांचे वक्तव्य
Bharat1.AI चे सह-संस्थापक आणि CEO उमाकांत सोनी म्हणाले, आपण AI क्रांतीतील एका निर्णायक टप्प्यावर आहोत. बुद्धिमत्ता आता प्रयोगशाळेबाहेर येऊन समाजाच्या रचनेचा भाग बनत आहे. प्रत्यक्ष जगात पडताळणी न करता प्रणाली मोठ्या प्रमाणावर वापरणे हा धोका आहे, जो आपण घेऊ शकत नाही. Bharat1.AI हे मानवतेसाठी आमचे मूनशॉट आहे. B1 AI Superpark हे शहर-स्तरीय व्हॅलिडेशन फ्रेमवर्क उभारण्याच्या दिशेने पहिले पाऊल आहे, जिथे एजेंटिक आणि फिजिकल AI केवळ शक्तिशालीच नव्हे, तर जबाबदारीने विकसित होऊ शकतील.
Web Summary : Bharat1.AI will build the world's first AI city in Bengaluru, featuring a 'B1 AI Superpark' for AI research and real-life agent training. The project aims for a humanity-centric approach, fostering innovation and responsible AI development with academic collaboration and high-speed internet.
Web Summary : भारत1.AI बेंगलुरु में दुनिया का पहला AI शहर बनाएगा, जिसमें AI अनुसंधान और वास्तविक जीवन एजेंट प्रशिक्षण के लिए 'B1 AI सुपरपार्क' होगा। परियोजना का उद्देश्य मानवता-केंद्रित दृष्टिकोण है, जो शैक्षणिक सहयोग और हाई-स्पीड इंटरनेट के साथ नवाचार और जिम्मेदार AI विकास को बढ़ावा देता है।