शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

हल्ली नव्या स्मार्टफोन्स सोबत ‘चपट्या पिन’चा Micro USB चार्जर का देत नाहीत? जाणून घ्या उत्तर

By सिद्धेश जाधव | Updated: February 3, 2022 18:55 IST

Why New Smartphones Are Not Coming With Micro USB Charger: दोन वर्षांपूर्वी लोकप्रिय असणारा चपट्या पिनचा चार्जर हल्लीच्या स्मार्टफोन्स सोबत का मिळत नाही?  चला जाणून घेऊया.  

जर तुम्ही गेले 5-6 वर्ष स्मार्टफोन्स वापरत असाल किंवा पाहात असाल तर तुम्ही एका मोठ्या बदलाचे साक्षीदार आहात. हा बदल म्हणजे सध्या येणारे स्मार्टफोन चपट्या पिनच्या (Micro USB) चार्जर ऐवजी टाईप-सी  (USB Type C) सह बाजारात येत आहेत. परंतु दोन वर्षांपूर्वी लोकप्रिय असणारा चपट्या पिनचा चार्जर हल्लीच्या स्मार्टफोन्स सोबत का मिळत नाही?  चला जाणून घेऊया.  

चपट्या पिनचा चार्जर म्हणजे मायक्रो यूएसबीचे प्रकार अनेक आहेत. हा चार्जर फक्त फोन्स नव्हे तर डिजिटल कॅमेरा आणि अन्य डिव्हाइसेसमध्ये वापरला जात होता. अजूनही काही डिव्हाइसेससोबत हा चार्जर येतो. यूएसबी टाईप-सी चे देखील अनेक प्रकार आहेत. हा चार्जर देखील गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर बदलला आहे. याचा वापर नवीन स्मार्टफोन आणि कम्प्युटर्समध्ये देखील केला जातो.  

दोन्ही चार्जर्सच्या प्रकारात मोठा फरक आहे. मायक्रो यूएसबीचा डेटा ट्रान्स्फरचा स्पीड फक्त 480 एमबीपीएस आहे, तर टाईप-सी  केबल 10 जीबीपीएसचा डेटा ट्रान्सफर स्पीड देते. चार्जिंगचा स्पीड देखील टाईप-सी  केबलमध्ये 100W पर्यंत जाऊ शकतो, तर मायक्रो यूएसबी फक्त 60W पर्यंत स्पीड देऊ शकतो. टाईप-सी  चार्जर तुम्ही कोणत्याही बाजूने प्लग करू शकता. पण जर मायक्रो यूएसबीची चुकीची बाजू प्लग केली तर तुमचा चार्जिंग पोर्ट आणि चार्जर दोन्ही बिघडू शकतात.  

या सर्व कारणांमुळे स्मार्टफोन कंपन्या चपट्या पिनच्या चार्जरचा निरोप घेत आहेत. परंतु अजूनही हा चार्जर काही स्मार्ट डिव्हाइसेसमध्ये दिसत आहे. तर यूएसबी टाईप-सी  चार्जर आता लवकरच अ‍ॅप्पलच्या आयफोनमध्ये देखील बघायला मिळू शकतो. युरोपियन युनियननं सर्व स्मार्टफोन्सचा एकच चार्जर असावा म्हणजे पर्यावरणाची हानी कमी होईल, असं म्हटलं आहे. यासाठी युनियननं यूएसबी टाईप-सी ला पसंती दर्शवली आहे, त्यामुळे टेक जाएंट अ‍ॅप्पलला देखील युरोपात विक्री करण्यासाठी अँड्रॉइड स्मार्टफोनचा चार्जर वापरावा लागू शकतो.  

हे देखील वाचा:

टॅग्स :technologyतंत्रज्ञान