शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

लै भारी! WhatsApp वर निवडक लोकांपासून लपवता येणार प्रोफाइल पीक, लास्ट सिन आणि स्टेटस  

By सिद्धेश जाधव | Updated: September 30, 2021 11:57 IST

WhatsApp New Privacy Settings: व्हॉट्सअ‍ॅपवर युजर्स आता निवडक कॉन्टॅक्ट्सपासून लास्ट सीन, स्टेटस, प्रोफाईल पिक्चर आणि स्टेटस लपवून ठेऊ शकतात. सध्या टेस्टिंगमध्ये असलेले हे फिचर लवकरच सर्वांसाठी उपलब्ध होईल.

व्हॉट्सअ‍ॅपवर इन्स्टंट मेसिजिंग अ‍ॅपचा अनुभव सुखकर करण्यासाठी सतत नवनवीन फीचर्स सादर करण्यात येत असतात. तसेच कंपनी जुन्या फीचर्समध्ये बदल करत असते. आता व्हॉट्सअ‍ॅप अँड्रॉइड बीटा युजर्ससाठी एक नवीन कस्टम प्रायव्हसी सेटिंगवर काम करत आहे. या सेटिंगचा वापर करून युजर्स निवडक लोकांपासून आपले स्टेटस, लास्ट सीन आणि प्रोफाईल फोटो लपवून ठेऊ शकतात.  

लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन प्रायव्हसी फीचर्स काही दिवसांपूर्वी आयओएसवरील बीटा अ‍ॅपवर दिसले होते. तर आता व्हॉट्सअ‍ॅपच्या अँड्रॉइड व्हर्जनवर देखील या फिचरची टेस्टिंग होत असल्याची माहिती समोर आली आहे. ही माहिती व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या फीचर्सवर बारकाईने लक्ष ठेवणाऱ्या Wabetainfo या टेक वेबसाईटने दिली आहे.  

व्हॉट्सअ‍ॅपवरील नवीन प्रायव्हसी सेटिंग्स 

रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅपवर युजर्स आता निवडक कॉन्टॅक्ट्सपासून लास्ट सीन, स्टेटस, प्रोफाईल पिक्चर आणि स्टेटस लपवून ठेऊ शकतात. सध्या टेस्टिंगमध्ये असलेले हे फिचर लवकरच सर्वांसाठी उपलब्ध होईल. आतापर्यंत व्हॉट्सअ‍ॅप लास्ट सीन, प्रोफाईल पिक्चर, अबाउटसाठी प्रायव्हसी सेटिंग्समध्ये कॉन्टॅक्टस वगळण्याचा पर्याय नव्हता, लवकरच हा पर्याय दिसू लागेल.  

या नव्या फीचरचा वापर करून तुम्ही अशा कॉन्टॅक्टची निवड करू शकता ज्यांना तुम्हाला तुमचा फोटो किंवा लास्ट सिन इत्यादी दाखवायचे नाहीत. जे लोक आपले खाजगी आयुष्य खाजगी ठेऊ इच्छितात त्यांच्यासाठी हे फिचर खूप उपयुक्त ठरू शकते. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार व्हॉट्सअ‍ॅपवर आता लास्ट सीनमध्ये युजर्सना ‘My contacts except…’ ऑप्शन मिळेल. सध्या लास्ट सीन कस्टमाइज करण्यासाठी Everyone, My contacts आणि Nobody असे तीनच पर्याय मिळत आहेत.  

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपAndroidअँड्रॉईड