शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
5
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
6
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
7
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
8
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
9
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
10
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
11
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
12
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
13
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
14
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
15
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
16
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
17
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
18
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
19
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
20
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता

Money Heist Season 5: WhatsApp ने सादर केले Money Heist स्टिकर पॅक; असे करा डाउनलोड 

By सिद्धेश जाधव | Updated: September 4, 2021 16:48 IST

Money Heist Season 5: WhatsApp ने Money Heist स्टिकर पॅक सादर केला आहे. स्टिकर सेक्शनमध्ये जाऊन हा पॅक डाउनलोड करता येईल.

WhatsApp वर वेगवेगळ्या प्रसंगी नवनवीन स्टिकर पॅक सादर होत असतात. आता या लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅपवर नेटफ्लिक्सच्या प्रसिद्ध क्राईम सीरिज मनी हाईस्टवर आधारित स्टिकर्स उपल्बध झाले आहेत. या स्टिकर पॅकचे नाव ‘Sticker Heist’ असून अँड्रॉइड आणि आयओएस डिवाइस युजर्स हा स्टिकर पॅक वापरू शकतात. या अ‍ॅनिमेटेड स्टिकर पॅकची निर्मिती Mucho Pixels यांनी केली आहे, या पॅकमध्ये 17 स्टिकर्स आहेत आणि याची साईज फक्त 658KB आहे. 

नेटफ्लिक्सच्या लोकप्रिय Money Heist सीरिजचा पाचवा हंगाम काल म्हणजे 3 सप्टेंबरला रिलीज करण्यात आला आहे. हा या हंगामाचा पहिला भाग आहे तर दुसऱ्या भागासाठी दर्शकांना डिसेंबरची वाट बघावी लागेल. पुढे आम्ही व्हॉट्सअ‍ॅपवरून मनी हाईस्ट स्टिकर्स कसे डाउनलोड करायचे याची संपूर्ण प्रक्रिया सांगितली आहे.  

Money Heist Stickers व्हॉट्सअ‍ॅपवरून डाउनलोड करून पाठवण्यासाठी  

  • सर्वप्रथम गुगल प्ले स्टोर किंवा अ‍ॅप्पल अ‍ॅप स्टोरवरून व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅप अपडेट करून घ्या.  
  • त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपवर जाऊन कोणतीही चॅट विंडो ओपन करा.  
  • आता स्माइलीज आयकॉनवर क्लीक करून स्टिकर टॅब ओपन करा. तिथे तुमच्या स्टिकर लिस्टच्या शेवटला असलेल्या ‘+’ वर क्लीक करा.  
  • त्यानंतर समोर आलेल्या यादीत ‘Sticker Heist’ पॅक शोध. हा पॅक सर्वात वरच असेल, परंतु नसल्यास स्क्रोल करा. 
  • आता स्टिकर डाउनलोड करा आणि तुमच्या चॅटची रंगत वाढवा.  

जर फक्त 17 स्टिकर्समधून तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करता येत नसतील तर तुम्ही अजून स्टिकर डाउनलोड करू शकता. यासाठी तुम्ही गुगल प्ले स्टोर आणि अ‍ॅप्पल अ‍ॅप स्टोरवर जाऊन “Money Heist stickers for WhatsApp” असा सर्च करून तुमच्या आवडीचे स्टिकर अ‍ॅप डाउनलोड करू शकता.  

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपNetflixनेटफ्लिक्स