शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
2
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
3
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
4
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
5
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
6
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
7
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
8
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
9
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
10
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
11
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
12
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
13
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
14
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
15
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
16
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
17
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
18
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
19
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

Tik Tok नेमके आहे तरी काय? जाणून घ्या फायदे तोटे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 11:32 IST

सध्या फेसबुक, युट्युबवर गंमतीशीर व्हिडिओ टाकले जातात. मनोरंजन जरी होत असले तरीही अशा अ‍ॅपमुळे व्यसनाच्या आहारी जाण्याचे धोके अनेक आहेत.

- तन्मय दीक्षित, सायबर एक्सपर्ट

मुंबई : सध्या फेसबुक, युट्युबवर गंमतीशीर व्हिडिओ टाकले जातात. हे व्हिडिओ सुरु केल्यानंतर त्यावर उजव्या किंवा डाव्या कोपऱ्यावर वॉटरमार्क दिसतो. असे व्हिडिओ कमालीचे व्हायरल होत आहेत. यामध्ये Tik tok हे अ‍ॅप ऑडिओ अँड व्हिडिओ मिक्सिंग करून लोकांना एंटरटेनमेंट व्हिडिओ दाखवण्यात अग्रेसर आहे. यामुळे मोबाईलवर सारखे पाहिल्यामुळे अनेक अडचणी जाणवतात.

  Tik Tok या अ‍ॅपवर अपलोड झालेला व्हिडिओ पाहून लोक त्यावरती प्रतिसाद देत असतात. बऱ्याचदा या ठिकाणी टाकलेल्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद येत आहे हे पाहून त्यामध्ये अजून एक... मग पुन्हा अजून एक... असे एका मागोमाग व्हिडिओ अपलोड केले जातात आणि मग लोक यात गुरफटून जातात व ते कधी याच्या आहारी गेले हे त्यांना पण कळत नाही. गेमसारखेच अशा प्रकारच्या अॅपचे व्यसन अनेकांना लागले आहे. 

व्हिडिओ तयार करून पैसा कमावला जाऊ शकतो का ?आपण इंटरनेटवर व्हिडिओ पाहत असताना कधी कधी छोटीशी एखादी जाहिरात दाखवली जाते. मोठा व्हिडिओ असल्यास मध्येच जाहिरात दाखवली जाते. ही जाहिरात पाहिल्यावर तो व्हिडिओ ज्याने बनवला आहे त्याला त्या बदल्यात काही मानधन दिले जाते. कारण तो व्हिडिओ पाहण्यासाठी वापरणारा काही काळ त्या वेबसाईटवर रेंगाळलेला असतो. आजच्या स्पर्धेच्या जीवनात बरेचजण कमी भांडवलात जास्तीतजास्त पैसे कसे मिळविता येतील यामागे असतात. जर कॉम्प्युटर आणि इंटरनेट वापरून व्हिडिओ बनवून पैसे कमावता येतात असे लक्षात आले तर ते आपले यूट्युब चॅनेल काढून त्यावर त्यांना हवे तसे ऑडिओ-व्हिडिओ टाकून घरबसल्या कमाई करू शकतात.

हे मोठे दुर्दैवच नाही का ?Tik tok हे अ‍ॅप वापरणाऱ्यांना या व्यसनाच्या आहारी कधी गेलो याचे भान राहत नाही. अशा अप्लिकेशनचा सातत्याने वापर करत असलेली व्यक्ती त्याच्या घरातील खऱ्या नातेसंबंधावर यामुळे होणारा दुष्परिणाम कसा होत असेल याचा विचार पण करत नाही. त्यांना फक्त त्याचा ऑनलाईन रेप्युटेशनच्या मागे धावायचं असतं.

यासाठी काही नियम आहेत का ?यासाठीचे नियम आणि उपाययोजना व्हिडिओ अपलोड आणि ब्रॉडकास्ट करणाऱ्या वेबसाईटवर दिलेले असतात. ते सर्व तर लागू होतातच पण आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध देशात त्या त्या देशातील सायबर कायदादेखील तसेच इतर त्या गुन्ह्यासंबंधीतही कायदा लागू केला जाऊ शकतो.

मुले याच्या आहारी गेली आहेत हे असे ओळखाल...

  • मोबाईल दिला नाही तर खूप चिडचिडेपणा करणे.
  • इंटरनेटवरील टिकटोक सुरू न झाल्यास अस्वस्थ होणे.
  • मोबाईल वापरला तरंच बरे वाटते.
  • कामाशिवायसुध्दा इतर बरेच वेळा मोबाईल वापरणे.
  • गाडी चालवित असताना आपले लक्ष केंद्रित आणि एकाग्र असणे आवश्यक असते पण त्यावेळी देखील जर इंटरनेटवर मजकूर पाठवत, ई-मेल करत, ट्वीट करत किंवा सर्फ करत असेल तर.
  • जेवण करत असताना आणि टीव्ही बघत असतानासुद्धा जर मोबाईलवर काही न काही करत असेल तर.
  • नोटिफिकेशन रिंग वाजताच मोबाईल पाहण्याची तीव्र ईच्छा निर्माण होत असेल तर 

शारीरिक परिणाम

  • डोळे : डोळ्यांना थकवा येणे, डोळे दुखणे, डोळ्यासमोर अंधारी येणे, धुसर दिसायला लागणे, डोळ्यांची जळजळ होणे, खाज येणे अथवा पाणी येऊ लागणे.
  • मानदुखी : सतत खाली पाहिल्याने होणारी ( text neck ) या मध्ये जेव्हा मान पूर्ण वरती करतो तेव्हा दुखते.
  • कान : सतत हेडफोन वापरल्यास बहिरेपणा येऊ शकतो.
  • फोनवर बसणाऱ्या जीवाणूंमुळेही आजार होऊ शकतो. बऱ्याच फोनवर ई- कोलाय विषाणू आढळतो. ज्यामुळे ताप, उलट्या आणि अतिसार होऊ शकतो. फोन दूषित असल्यास त्वचेची समस्या होऊ शकते
  • पुरुषांमध्ये नपुंसकत्व : अभ्यासाने उघड केले आहे की सेलफोनचे विकिरण शुक्राणुंची संख्या, शुक्राणूची गतिशीलता आणि व्यवहार्यता कमी करतो. 

मानसिक प्रभाव१. उदासीनता.२. प्रेरक अव्यवहार्य विकार.३. रात्रीच्या वेळी जास्त चिंताग्रस्त होणे४. झोपेची गुणवत्ता कमी होणे.५. फोनमधून निघणारा किरणे डोक्यास घातक ठरू शकतात.

अशा प्रकारें काळजी घ्यावी१. यासाठी आई-वडिलांनी आपली मुले मोबाईलवर काय करत असतात हे काळजीपूर्वक पाहावे.२. त्यांच्या वागण्या-बोलण्यात एकदम बदल घडून आलेलं लक्षात आल्यास हा बदल का घडून येत आहे याचे कारण पाहावे.३. खरे जीवन आणि ऑनलाईन रेप्युटेशन यांतील फरक त्यांना समजून सांगावा.४. कोणतेही इलेक्ट्रॉनिक खेळणे ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ एका दिवसात खेळायला देऊ नये.५. पौष्टिक खाणे खाण्याची आवड निर्माण करावी.६. डोळे पाण्याने सातत्याने धुवावे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञान