शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

भाई, फेक काॅल आल्यावर करायचे काय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 05:59 IST

आता त्याचा पुढे जाऊन आपल्याला हव्या त्या नंबरने किंवा आवाज बदलून कॉल करता येईल असे ॲप्सही शेकडोने विनामूल्य उपलब्ध असून त्याचा गैरवापरही सुरु आहे...

- दीपक होमकर पुणे : पूर्वी लॅण्डलाईनवर येणारे कॉल्स कोणाचे हे कळत नसायचे त्यामुळे लॅण्डलाईनला कॉलरआडी डिस्ल्पे स्क्रिन आली, पुढे मोबाईल आला आणि त्यावरही ही सुविधा उपलब्ध असल्याने आपल्याला कोणाचा कॉल आला ते सहजपणे कळत होतं. पुढे अँड्रॉईड टेक्नॉलॉजी आली आणि मोबाईलचं जग बदलून गेलं. मोबाईलवर काहीही (हवं ते आणि नको ते) करण्यासाठी हजारो ॲप्सची निर्मिती झाली. आपल्याकडे सेव्ह नसलेला नंबर (अननोन नंबर्स) कोणाचा हे कळण्यासाठी शेकडो ॲप्स उपलब्ध आहेत. त्यामध्ये truecaller हे ॲप लोकप्रिय झाले; मात्र त्यावरही उपाय शोधत युजर्सनी फेक नाव सेव्ह केल्याने truecaller वर चुकीची नावे यायला लागली. आता त्याचा पुढे जाऊन आपल्याला हव्या त्या नंबरने किंवा आवाज बदलून कॉल करता येईल असे ॲप्सही शेकडोने विनामूल्य उपलब्ध असून त्याचा गैरवापरही सुरु आहे...असे काम करते ॲपफेक कॉल ॲप फोनमध्ये इन्स्टॉल करताच ट्रू कॉलरमधून कॉलिंगची की उपलब्ध होते. त्यापूर्वी त्यामध्ये कॉल करणाऱ्याचा कॉलर आयडी जो हवा तो (नंबर-नाव) ॲप वापरकर्त्याला सेव्ह करावे लागते. अनेक ॲप्सवर तर कॉल करणाऱ्याचा आवाज बदलता येतो. कुठे मिळतात फेक ॲप्सगुगलवर फेक कॉलर आयडी असं सर्च केले की शेकडो ॲप्स दिसायला लागतात. प्लेस स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर असे ॲप्स दिसणार नाहीत. कारण या कंपन्यांकडून फेक गोष्टींचे समर्थन केले जात नाही. मात्र गुगलवर ॲप्सचा शोध घेतला तर शेकडो ॲप्सची यादीच समोर येते. स्पुफिंगचे प्रकार वाढलेकॉल स्पुफिंगचा म्हणजे एखाद्याला फोन करून मी अमूक मंत्र्याच्या, अधिकाऱ्याच्या किंवा सेलिब्रेटीच्या घरातून, ऑफिसमधून बोलतो असे सांगून खंडणी मागितली जाते, किंवा धमकी दिली जाते. त्यासाठी संबंधित मंत्री, अधिकारी, सेलिब्रेटी यांचा पर्सनल, ऑफिशिअल नंबर माहिती करतात.यातून वाचाल कसे फेक कॉलर ॲप्सपासून वाचण्यासाठी अद्याप तरी ॲन्टी व्हायरस सॉफ्टवेअर उपलब्ध नाहीत. त्यामुळे अशा कॉल्सना ब्लॉक करण्याची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे असे कॉल्स आल्यानंतर चौकस बुद्धी ठेवून कोणाकडून नेमका फोन आला होता त्याची दुसऱ्या नंबरवरून उलट तपासणी करणे महत्त्वाचे ठरते.