शहरं
Join us  
Trending Stories
1
तनिषा भिसे मृत्यू प्रकरण : ससूनची दीनानाथ रुग्णालयासह डॉ. घैसास यांना ‘क्लीन चिट’
2
अजितदादा-शरद पवार एकत्र येण्यासाठी पांडुरंगाच्या चरणी साकडे घातले का? सुनील तटकरे म्हणाले...
3
देवेंद्र फडणवीसांच्या विधानसभा २०२४ च्या विजयाला आव्हान; हायकोर्टाने समन्स बजावले
4
VIDEO: परप्रांतीय विक्रेत्याने गटारात धुतले ताडगोळे; खेडमधील किळसवाणा प्रकार
5
...तर अमेरिकनांचा इन्कम टॅक्स कायमचा बंद होईल; टेरिफ वॉरवरून ट्रम्पनी स्वत:चीच पाठ थोपटून घेतली
6
वक्फ कायद्यात एक जरी चूक निघाली तरी खासदारकीचा राजीनामा देणार; जेपीसी अध्यक्षांची मोठी घोषणा
7
भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाने शोधला एलियन्सचं वास्तव्य असलेला ग्रह, संशोधनानंतर केला दावा
8
“जनतेला फसवणाऱ्या महायुती सरकारविरोधात लढाई तीव्र करणार”; मुंबई बैठकीत काँग्रेसचा निर्धार
9
महेश मांजरेकरांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर; मुक्ता बर्वे, काजोलचाही होणार सन्मान
10
Waqf Law: नव्या वक्फ कायद्यातील दोन तरतुदींना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; सरकारकडून मागितलं उत्तर
11
"....म्हणून मी तिला देणार नाही घटस्फोट’’,  होणाऱ्या जावयासोबत पळाळेल्या महिलेच्या पतीनं सांगितलं कारण
12
कोकणची राणी होत Ratnagiri Jets मधून नव्या प्रवासाला निघाली स्मृती मानधना
13
मोठ्या पडद्यावर ब्लॉकबस्टर, ओटीटीवर सुपरफ्लॉप; 'छावा'ची नेटफ्लिक्सवर वाईट अवस्था
14
स्वारगेट प्रकरणात मोठी अपडेट..! आरोपी दत्ता गाडेविरोधात 893 पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
15
५० कोटींचा 'तो' श्वान निघाला भारतीय जातीचा; ईडीने धाड टाकल्यावर मालकाने सगळेच सांगितले
16
उदयनराजे, उद्धव ठाकरेंच्या मागणीला संभाजीराजेंचे समर्थन; म्हणाले, “किल्ल्यांचे जतनही व्हावे”
17
जमिनीवर भिंतीवर आपटले, मन भरलं नाही म्हणून दगडाने ठेचले; श्वान प्रेमीने केली पाच पिल्लांची हत्या
18
रात्रीच्या जेवणात चुकूनही खाऊ नका 'या' ३ गोष्टी; सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्टचा मोलाचा सल्ला
19
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सच्या संघात 'मारिया शारापोवा'; MS Dhoni शी आहे खास कनेक्शन
20
महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदीच्या सक्तीवरून राज ठाकरे आक्रमक, म्हणाले. "आज भाषा सक्ती करत आहेत, उद्या…’’, 

मोबाईलवर पॉर्न बघणे असे पडू शकते महागात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2018 17:04 IST

उत्साहाच्या भरात अनेकजण या इंटरनेट जास्तीत जास्त पॉर्न बघण्यासाठी करतात. पण हे किती घातक ठरु शकतं याची त्यांना कल्पनाही नसते.

अलिकडे मोबाईलवर पॉर्न बघण्याचं प्रमाण अधिक वाढलं आहे. कमी पैशात मिळणारी इंटरनेट सेवा याला कारणीभूत मानता येईल. उत्साहाच्या भरात अनेकजण या इंटरनेट जास्तीत जास्त पॉर्न बघण्यासाठी करतात. पण हे किती घातक ठरु शकतं याची त्यांना कल्पनाही नसते.

तुम्ही जर स्मार्टफोनवर पॉर्न बघत असला तर तुम्ही वेळीच सावधान होण्याची गरज आहे. कारण स्मार्टफोनवर पॉर्न सिनेमे किंवा पॉर्न व्हिडीओ बघणे धोकादायक ठरू शकतं. चला जाणून घेऊया स्मार्टफोनवर पॉर्न बघणं कशाप्रकारे त्रासदायक ठरू शकतं.

इंटरनेटच्या जाळ्यात असे अनेक अ‍ॅप्स आता समोर आलेत, ज्यावर तुम्ही पॉर्न बघू शकता. पण असे अ‍ॅप स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड करणं तुम्हाला महागात पडू शकतं. या अ‍ॅप्सद्वारे तुमच्या स्मार्टफोनमध्ये व्हायरस येण्याची जास्त शक्यता असते किंवा वेगवेगळ्या साईट्सवर तुम्ही गेलात तर अनेक अ‍ॅप्स अ‍ॅटोमॅटिक तुमच्या स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड होतात. यातून मोबाईलमध्ये व्हायरस येण्याची शक्यता असते. 

* अनेक पॉर्न दाखवण्या-या वेबसाईट्स बेकायदेशीरपणे व्हॅल्यू अ‍ॅडेड सर्व्हिस जोडून जास्त पैसे कमावण्याच्या मागे असतात. अ‍ॅण्ड्रॉईड फोनवर पॉर्न वेबसाईट उघडताच VAS सर्व्हिस आपोआप तुमच्या फोनमध्ये अ‍ॅक्टीव्ह होतात. आणि याचा तुम्हाला पत्ताही लागत नाही. इतकेच नाहीतर यामुळे तुमच्या बॅलन्समधून परस्पर पैसेही कापले जाऊ शकतात. 

* अ‍ॅण्ड्रॉईड फोनवर दिसणारे पॉर्न जाहीरातीचे टीकर ही एक जुनी समस्या आहे. दिसण्यात हे तसे खरे वाटतात पण युजर्स अनेकदा फसले जातात. पॉर्न टीकर हे फोनमध्ये व्हायरस पाठवण्यासाठी तयार केले जातात. पण त्यावर दिसणारी चित्रे पाहून अनेकजण त्यावर क्लिक करतात आणि चुकी करून बसतात.

* सर्वच अ‍ॅण्ड्रॉईड फोनवर कोणत्या ना कोणत्या जीमेल आयडीने लॉगीन केलं जातं. अशात जेव्हा तुम्ही ऑनलाईन पॉर्न बघत असाल तर ही माहिती पुढे कुणालाही लगेच मिळू शकते. यामुळे तुमच्या फोनची सिक्युरिटी आणि प्रायव्हसी धोक्यात येऊ शकते. याप्रकारे तुम्ही सायबर क्राईम गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकू शकता.

* पॉर्न साईट्सवर काही असे व्हायरस असतात जे तुमच्या डिव्हाईसला लॉक करतात. ते अनलॉक करण्यासाठी काही बेकायदेशीर वेबसाईट तुम्हाला ब्लॅकमेल करतात आणि तुमच्याकडून पैसे उकळतात. ते तुमच्या मोबाईलमधून पर्सनल डेटाही चोरू शकतात. त्यामुळे तुम्हाला अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. यातून वाचण्यासाठी स्मार्टफोनवर पॉर्न बघणे टाळलेले बरे. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञान