शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 07:52 IST

३.६ ते १६.४ अंश फॅरेनहाइटने वाढले तापमान

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: ज्या भागात ‘एआय डेटा सेंटर्स’ उभारले जात आहेत, तिथे तापमानात कमालीची वाढ होते आहे, असा निष्कर्ष केंब्रिज विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या एका ताज्या संशोधनातून समोर आला आहे. या तापमानातील वाढीमुळे जगभरातील सुमारे ३४ कोटींहून अधिक लोकांना उष्णतेच्या तीव्र झळा सोसाव्या लागू शकतात, असा इशारा या अभ्यासात देण्यात आला आहे. मेक्सिको व स्पेन यांसारख्या देशांमध्येही डेटा सेंटर्सच्या वाढत्या संख्येमुळे तेथील तापमानात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

समस्या गंभीर होणार

तज्ज्ञांच्या मते, येणाऱ्या काळात एआय डेटा सेंटर्सची संख्या आणखी वेगाने वाढणार आहे, ज्यामुळे ही समस्या अधिक भयावह रूप धारण करू शकते. यामुळे पर्यावरण, मानवी आरोग्यावर याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. 

२० वर्षांचा अभ्यास

  • केंब्रिज विद्यापीठाने गेल्या २० वर्षांतील हवामानातील बदलांच्या आकडेवारीचे सखोल विश्लेषण केले आहे. या संशोधनासाठी जगभरातील ६,००० हून अधिक डेटा सेंटर्सच्या आसपासच्या क्षेत्रांचा समावेश करण्यात आला होता. 
  • ग्लोबल वॉर्मिंगसारखे घटक बाजूला ठेवून केवळ डेटा सेंटर्सच्या परिणामांचा अभ्यास केला असता, तापमानात स्पष्ट वाढ झाल्याचे शास्त्रज्ञांना दिसून आले आहे.
  • मेक्सिको व स्पेन यांसारख्या देशांमध्येही याच प्रकारचा पॅटर्न पाहायला मिळाला असून, तिथे डेटा सेंटर्सच्या संख्येत वाढ होताच तापमानाचे आकडेही वाढले.

३.६ ते १६.४ अंश फॅरेनहाइटने वाढले तापमान

संशोधनात असे आढळले आहे की, एखादे डेटा सेंटर सुरू झाल्यानंतर त्याच्या आसपासच्या १० किलोमीटरच्या परिघात सरासरी ३.६ अंश फॅरेनहाइटने तापमान वाढते. ही विशिष्ट प्रकरणांमध्ये तर ही वाढ १६.४ अंश फॅरेनहाइटपर्यंत नोंदविण्यात आली आहे. डेटा प्रोसेसिंग आणि सर्व्हर्सना थंड ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘कुलिंग सिस्टीम’मधून बाहेर पडणारी उष्णता हे या तापमानवाढीचे मुख्य कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : AI Data Centers: A Growing Threat to Global Temperatures

Web Summary : AI data centers significantly increase local temperatures, impacting millions. Cambridge University's study reveals a concerning trend: data center proliferation correlates with rising temperatures, particularly in areas like Mexico and Spain, exacerbating global warming and posing severe health risks. Cooling systems are the main culprit.
टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सTemperatureतापमान