शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

लिंक्डइनवर व्हॉईस एसएमएसची सुविधा

By शेखर पाटील | Updated: July 30, 2018 12:58 IST

लिंक्डइनवर व्हॉईस एसएमएस पाठविण्याची सुविधा देण्यात आली असून हे फिचर जगभरातील युजर्सला वापरता येणार आहे.

लिंक्डइनवर व्हॉईस एसएमएस पाठविण्याची सुविधा देण्यात आली असून हे फिचर जगभरातील युजर्सला वापरता येणार आहे. लिंक्डइन हे प्रोफेशनल नेटवर्क मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. अलीकडेच याला मायक्रोसॉफ्टने खरेदी केले असून यात नवनवीन फिचर्स देण्याचा सपाटा लावला आहे. या अनुषंगाने आता लिंक्डइनवर व्हॉईस एसएमएस ही नाविन्यपूर्ण सेवा सुरू करण्यात येत आहे. आजवर लिंक्डइन वापरणार्‍या युजर्सला इतरांशी संवाद साधतांना मॅन्युअल टायपिंगशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. अनेकदा युजर व्यस्त असतांना आणि विशेष करून प्रवासात असतांना टाईप केलेला मॅसेज पाठविणे तसे जिकरीचे असते. नेमकी हीच समस्या लक्षात घेत आता लिंक्डइनच्या युजर्सला ध्वनीच्या स्वरूपातील संदेशांची देवाण-घेवाण करण्याची सुविधा मिळणार आहे. लिंक्डइनने एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून याबाबत अधिकृत माहिती जाहीर केली आहे.

या ब्लॉग पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे की, लिंक्डइनचे युजर्स आता ध्वनी संदेशांची देवाण-घेवाण करू शकणार आहेत. अशा प्रकारचा संदेश पाठविण्यासाठी कोणत्याही युजरला अ‍ॅपवर असणार्‍या मायक्रोफोनच्या आयकॉनवर क्लिक करावे लागेल. यानंतर यावरून पाठविण्यात येणार्‍या संदेशाचे रेकॉर्डींग करावे लागेल. सध्या तरी फक्त एक मिनिटांपर्यंतचा मॅसेज या सेवेच्या माध्यमातून पाठविता येणार आहे. या अ‍ॅपच्या अँड्रॉइड व आयओएस या दोन्ही प्रणालीच्या युजर्सला हे फिचर येत्या काही दिवसांमध्ये क्रमाक्रमाने अपडेटच्या स्वरूपात प्रदान करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात वेब आवृत्तीवरून व्हाईस एसएमएस पाठविण्याची सुविधा नसली तरी  यावरून या प्रकारातील संदेश रिसिव्ह करता येणार आहेत. तर लवकरच वेबवरूनही संदेश पाठविण्याची सुविधा मिळण्याची दाट शक्यता आहे. यामुळे लिंक्डइनवर युजर्सचा एकमेकांशी संवाद वाढण्याची शक्यता आहे. या माध्यमातून लिंक्डइन हे प्रोफेशनल नेटवर्क हळूहळू मॅसेजींगवर लक्ष केंद्रीत करत असल्याचे अधोरेखित झाले आहे.

लिंक्डइने काही दिवसांपूर्वीच आपल्या अ‍ॅपची लाईट आवृत्ती दाखल केली आहे. पहिल्यांदा याला भारतात सादर करण्यात आले असून लवकरच ६० देशांमध्ये याला उपलब्ध करण्यात येणार आहे. यातच आता व्हाईस टायपिंगसारखे फिचर लाँच करण्यात आल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMessengerमेसेंजर