शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

व्होडाफोन-आयडियाची मोदी सरकारला मोठ्ठी ऑफर; 1 रुपयांत कंपनीच घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2020 15:07 IST

कंपनीला गेल्या दशकात जवळपास दोन लाख कोटींचा तोटा झाला आहे. आणि आता सरकारला 53000 कोटी रुपयांचा एजीआर द्यायचा आहे.

ठळक मुद्देकील मुकूल रोहतगी यांनीच ही ऑफर देऊ केल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. कंपनी बुडाली तर 10000 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात असणार आहे.जर कंपनी बंद पडली तर टेलिकॉम सेक्टरमध्ये स्पर्धा संपून जाईल आणि केवळ दोनच कंपन्या उरतील. 

नवी दिल्ली : व्होडाफोन-आयडियाने केंद्र सरकारला एक अशी ऑफर देऊ केली आहे की अशी ऑफर जगात कोणीच अद्याप दिलेली नसेल. ही ऑफर आयडिया कंपनीची जाहिरात 'व्हॉट अ‍ॅन आयडिया सरजी!' याच्याशी मिळतीजुळती आहे. तसेच कंपनीने सरकारला सांगितले आहे की केवळ 1 रुपया देऊन तुम्ही अख्खी कंपनी खरेदी करू शकता.

 कंपनीला गेल्या दशकात जवळपास दोन लाख कोटींचा तोटा झाला आहे. आणि आता सरकारला 53000 कोटी रुपयांचा एजीआर द्यायचा आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये व्होडाफोनकडून बाजू मांडणारे वकील मुकूल रोहतगी यांनीच ही ऑफर देऊ केल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. त्यांनी दूरसंचार सचिव अंशू प्रकाश यांच्याशी फोनवर चर्चा केली. जर कंपनी बुडाली तर 10000 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात असणार आहे. यासंदर्भात रोहतगी यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. या चर्चेनंतर व्होडाफोन इंडियाचे अध्यक्ष आदित्य बिर्ला यांनी दूरसंचार विभागाचे अधिकारी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन याच्याशी चर्चा केल्याचे बोलले जात आहे. 

आता ही नवीन 1 रुपयांत कंपनी खरेदी करण्याची काय भानगड आहे. तर बीएसएनएल 4 जी स्पेक्ट्रम आणि नेटवर्कसाठी प्रयत्न करत आहेत. अशातच सरकारने जर व्होडाफोन आयडिया खरेदी केली तर आयते 30 कोटी ग्राहक मिळणार आहेत. बीएसएनएलच्या 3 जी हून 4 जी मध्ये जाण्याच्या प्रयत्नांना व्होडाफोन आयडियाचे नेटवर्क मदत करेल. यामुळे 1 रुपयांत कंपनीच खरेदी करण्याची ऑफर याच संदर्भातून देण्यात आली आहे. जर सरकारने कंपनीला वाचविण्यासाठी प्रयत्न केले नाहीत तर टेलिकॉम सेक्टर बुडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

रोहतगी यांनी मीडिय़ाला आधीच इशारा दिलेला आहे. जर कंपनी बंद पडली तर टेलिकॉम सेक्टरमध्ये स्पर्धा संपून जाईल आणि केवळ दोनच कंपन्या उरतील. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर व्होडाफोनने 2150 कोटीं सरकारी तिजोरीत जमा केले होते. यानंतर रविवारी एक हजार कोटी भरले आहेत. कंपनीला 15 वर्षांचा अवधी हवा आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीVodafoneव्होडाफोनIdeaआयडियाNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनBSNLबीएसएनएल