शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या मूल्यासह सर्व फीचर्स

By शेखर पाटील | Updated: August 20, 2018 10:42 IST

विवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी वाय ८३ प्रो हा नवीन स्मार्टफोन सादर केला असून याच्या अगावू नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे.

विवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी वाय ८३ प्रो हा नवीन स्मार्टफोन सादर केला असून याच्या अगावू नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे. विवो कंपनीने या वर्षी मे महिन्यात विवो वाय ८३ हा स्मार्टफोन सादर केलेला आहे. याचीच पुढील आवृत्ती विवो वाय ८३ प्रो या मॉडेलच्या माध्यमातून भारतीय ग्राहकांना उपलब्ध करण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विवो कंपनी आपला विवो व्ही ११ हा स्मार्टफोन लाँच करणार आहे. मात्र याआधी विवो वाय ८३ प्रो हे मॉडेल ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहे. 

विवो वाय ८३ प्रो या मॉडेलमध्ये ६.२२ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस म्हणजे १५२० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. हा डिस्प्ले फुल व्ह्यू २.० या प्रकारातील आहे. याच्या वरील भागात नॉच दिलेला असून यात फ्रंट कॅमेरा आणि अन्य सेन्सर्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यामध्ये नेमका कोणता प्रोसेसर असेल याची माहिती देण्यात आलेली नाही. तथापि, याची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविता येणार आहे.  याच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप दिलेला आहे. यामध्ये १३ व २ मेगापिक्सल्सच्या कॅमेर्‍यांचा समावेश असणार आहे. तर यातील फ्रंट कॅमेरा हा ८ मेगापिक्सल्सचा आहे.

विवो वाय ८३ प्रो हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ओरियो ८.१ या आवृत्तीपासून विकसित केलेल्या फनटच ४.० या ऑपरेटींग सिस्टीमवर चालणारा आहे. तर यामध्ये ३,२६० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. याचे मूल्य १५,९९० रूपये असून विवोच्या देशभरातील शॉपीजमधून याची अगावू नोंदणी सुरू करण्यात आली आहे. लवकरच याला ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध करण्यात येईल असे मानले जात आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइल