शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

विवोचा नवीन स्वस्त स्मार्टफोन भारतात लाँच; 5000mAh बॅटरी, 5GB रॅमसह Vivo Y21 बाजारात दाखल 

By सिद्धेश जाधव | Updated: August 20, 2021 12:26 IST

Vivo Y21 Price in India: Vivo Y21 स्मार्टफोन डायमंड ग्लो आणि मिडनाईट ब्लु अश्या दोन रंगात अ‍ॅमेझॉन इंडियावर खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे.

ठळक मुद्देVivo Y21 स्मार्टफोन डायमंड ग्लो आणि मिडनाईट ब्लु अश्या दोन रंगात अ‍ॅमेझॉन इंडियावर खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. Vivo Y21 च्या बॅक पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो.

विवोने बजेट सेगमेंटमध्ये नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर केला आहे. कंपनीने आपल्या वाय सीरिजमध्ये Vivo Y21 2021 स्मार्टफोन जोडला आहे. या फोनमध्ये विवोने एक्सटेंडेड रॅम फिचर दिले आहे. युजर्स या फोनमधील रॅम 1GB ने वाढवू शकतात. Vivo Y21 2021 मध्ये 5000mAh ची बॅटरी आणि Helio P35 चिपसेट देण्यात आला आहे. चला जाणून घेऊया या स्वस्त स्मार्टफोनचे फीचर्स स्पेसिफिकेशन्स आणि किंमत.  

Vivo Y21 चे स्पेसिफिकेशन्स 

Vivo Y21 मध्ये कंपनीने 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले दिला आहे. हा एक वॉटरड्रॉप नॉच असलेला एलसीडी पॅनल आहे. जो 20:9 अस्पेक्ट रेशियो आणि 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशनआला सपोर्ट करतो. या विवो फोनमध्ये मीडियाटेकचा हीलियो पी35 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 वर आधारित फनटच ओएस 11.1 वर चालतो. हा फोन 4GB रॅम + 1GB एक्सटेंडेड रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.  हे देखील वाचा: 50MP कॅमेरा, 90Hz रिफ्रेश रेट आणि 5000mAh बॅटरीसह Xiaomi Redmi 10 स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या किंमत

Vivo Y21 च्या बॅक पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो. या सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर देण्यात आला आहे. त्याचबरोबर कंपनीने 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या विवो फोनमध्ये 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा मिळतो. साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर असलेला हा फोन 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: 20 तासांच्या बॅकअपसह सर्वात किफायतशीर ट्रू वायरलेस स्टीरियो JBL इयरबड्स भारतात सादर

Vivo Y21 ची किंमत 

Vivo Y21 स्मार्टफोन डायमंड ग्लो आणि मिडनाईट ब्लु अश्या दोन रंगात अ‍ॅमेझॉन इंडियावर खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. या फोनच्या दोन व्हेरिएंटची किंमत पुढील प्रमाणे:   

  • 4GB RAM + 64GB Storage: 13,990 रुपये  
  • 4GB RAM + 128GB Storage: 15,490 रुपये  
टॅग्स :VivoविवोSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड