शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

Vivo लाँच केला जबरदस्त फ्लॅगशिप स्मार्टफोन; स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट, 50 एमपी क्वाड रियर कॅमेरा आणि अजून बरंच काही... 

By सिद्धेश जाधव | Updated: June 28, 2021 12:22 IST

Vivo X60t Pro+ Official: नवीन विवो X60T Pro+ व्हेरिएंट Vivo X60 Pro+ चा डाउनग्रेडेड व्हर्जन आहे, असे स्पेक्सवरून वाटत आहे.

Vivo ने यावर्षीच्या सुरुवातीला आपली फ्लॅगशिप Vivo X60 सीरीज लाँच केली होती. या सिरीजमध्ये Vivo X60, Vivo X60 Pro, Vivo X60 Pro+ आणि Vivo X60 Curved एडिशन असे स्मार्टफोन्स लाँच केल्यानंतर कंपनीने आता Vivo X60T Pro+ नावाचा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. नवीन विवो X60T Pro+ व्हेरिएंट Vivo X60 Pro+ चा डाउनग्रेडेड व्हर्जन आहे, अशी चर्चा आहे.  (Vivo X60t Pro+ Goes Official With Snapdragon 888 And 50mp Quad-camera Setup)

Vivo X60T Pro+चे स्पेसिफिकेशन्स 

Vivo X60T Pro+ मध्ये 6.56-इंचाचा Full HD+ E3 कर्व अ‍ॅमोलेड डिस्प्ले 2376×1080 पिक्सल रिजोल्यूशनसह देण्यात आला आहे. आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. या डिस्प्लेमध्ये ऑप्टिकल इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि पंच होल नॉच देण्यात आली आहे. Vivo X60T Pro+ मध्ये Qualcomm Snapdragon 888 प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी Adreno 660 GPU देण्यात आला आहे. हा फोन Android 11 आधारित OriginOS 1.0 वर चालतो.  

फोटोग्राफीसाठी Vivo X60T Pro+ मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील मुख्य कॅमेरा 50MP चा आहे. तसेच या फोनमध्ये 48MP चा अल्ट्रा वाईड अँगल सेन्सर, 5X ऑप्टिकल झूमसह 8MP पेरिस्कोप लेन्स आणि 12MP चा पोर्टेट सेन्सर देण्यात आला आहे. Vivo X60T Pro+ मध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 4200mAh ची बॅटरी आणि 55W फास्ट चार्ज टेक्नॉलॉजी मिळते.  

Vivo X60T Pro+ ची किंमत  

Vivo X60T Pro+ कंपनीने दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच केला आहे. या स्मार्टफोनचा 8GB + 128GB व्हेरिएंट 4,999 RMB (अंदाजे 57,500 रुपये) तर 12GB + 256GB मॉडेल 5,999 RMB (अंदाजे 69,000 रुपये) मध्ये बाजारात दाखल झाला आहे.  

टॅग्स :VivoविवोSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड