शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

सॅमसंग-शाओमीला विसरा! दोन-दोन डिस्प्लेसह आला भन्नाट Vivo X Fold; मिळणार 512GB मेमरी  

By सिद्धेश जाधव | Updated: April 12, 2022 12:31 IST

Vivo X Fold हा कंपनीचा सर्वात पहिला फोल्डेबल स्मार्टफोन आहे. यात 50MP कॅमेरा, 12GB RAM, 120Hz रिफ्रेश रेट आणि 46000mAh बॅटरी आहे.

Vivo नं काल चीनमध्ये लाँच झालेल्या एका इव्हेंटमधून आपला अनोख्या डिवाइसचा पेटारा उघडला आहे. कंपनीनं Vivo X Fold नावाचा पहिला फोल्डिंग फोन सादर केला आहे. सोबत Vivo X Note आणि Vivo Pad टॅबलेट देखील बाजारात आला आहे. परंतु दोन डिस्प्लेसह येणाऱ्या Vivo X Fold ची चर्चा सर्वाधिक केली जात आहे. फोल्डिंग फोन्स सेगमेंटमध्ये सध्या सॅमसंगचं राज्य आहे त्यामुळे हा डिवाइस नक्कीच सॅमसंगला चांगली टक्कर देईल.  

Vivo X Fold चे स्पेसिफिकेशन्स 

Vivo X Fold मध्ये दोन डिस्प्ले आहेत. बाहेरच्या अ‍ॅमोलेड डिस्प्लेचा आकार 6.53 इंच आहे. तर आतल्या बाजूस 8.03 इंचाचा फोल्ड अर्थात घडी होणारा मोठा डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 1800x2200 पिक्सल रिजोल्यूशन आणि LTPO3 ला सपोर्ट करतो. दोन्ही डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि इन-डिस्प्ले अल्ट्रासॉनिक फिंगरप्रिंट स्कॅनरसह येतात. फोल्डिंग डिस्प्ले 60 व 120 डिग्री अँगलवर देखील खुला करून ठेवता येतो.  

Vivo X Fold ची प्रोसेसिंग पावर देखील तशीच देण्यात आली आहे. यात क्वॉलकॉमचा सर्वात शक्तिशाली Snapdragon 8 Gen 1 चिपसेट मिळतो. सोबत 12GB RAM आणि 256GB किंवा 512GB स्टोरेज मिळते. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागे क्वॉड कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 50MP चा मेन कॅमेरा, 48MP चा अल्ट्रा वाईड सेन्सर, 12MP ची पोट्रेट लेन्स आणि 5MP ची टेलीफोटो लेन्स मिळते. Vivo X Fold मध्ये दोन सेल्फी कॅमेरे मिळतात एक आतल्या डिस्प्लेवर तर एक बाहेरील डिस्प्लेवर. स्मार्टफोनमध्ये 4600mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी 66W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. 

Vivo X Fold ची किंमत 

Vivo X Fold सध्या चीनमध्ये Black, Blue आणि Grey कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे. याची किंमत 8,999 युआन (सुमारे 1,07,200 रुपये) पासून सुरु होते. तर मोठ्या व्हेरिएंटसाठी 9,999 युआन (जवळपास 1,19,100 रुपये) मोजावे लागतील. लवकरच हा फोन भारतात येण्याची शक्यता देखील आहे.  

टॅग्स :VivoविवोSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडMobileमोबाइल