शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

विवो व्ही ९ यूथ : जाणून घ्या सर्व फिचर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2018 16:30 IST

विवो कंपनीने विवो व्ही ९ युथ हा नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतरण्याची घोषणा केली आहे. विवो कंपनीने अलीकडेच विवो व्ही ९ हा अतिशय उत्तमोत्तम फिचर्सने सज्ज असणारा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना सादर केला आहे.

विवो कंपनीने विवो व्ही ९ युथ हा नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतरण्याची घोषणा केली आहे. विवो कंपनीने अलीकडेच विवो व्ही ९ हा अतिशय उत्तमोत्तम फिचर्सने सज्ज असणारा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना सादर केला आहे. याचीच नवीन आवृत्ती युथ एडिशनच्या माध्यमातून सादर करण्यात आलेली आहे. अर्थात यात मूळ मॉडेलपेक्षा थोडे कमी फिचर्स देण्यात आले आहेत.काळा आणि सोनेरी या दोन रंगाच्या पर्यायांमध्ये हे मॉडेल ग्राहकांना १८,९९९ रूपये मूल्यात देशभरातील शॉपीजमधून खरेदी करता येईल. याशिवाय, फ्लिपकार्ट, अमेझॉन इंडिया आणि पेटीएममॉल या शॉपिंग साईटवरूनही याला उपलब्ध करण्यात आले आहे. यातील ६.३ इंच आकारमानाचा डिस्प्ले फुल एचडी प्लस म्हणजेच २२८० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा असून यावर कॉर्नींग गोरीला ग्लास ३ चे संरक्षण आवरण आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन ४५०  प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे.

विवो व्ही ९ युथ या स्मार्टफोनच्या मागील बाजूस १६ आणि २ मेगापिक्सल्स क्षमतांचे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. यात बोके इफेक्ट देण्याची सुविधा आहे. याशिवाय यात कृत्रीम बुध्दीमत्तेने युक्त असणारी एआय ब्युटी मोड प्रणाली, टाईम लॅप्स फोटोग्राफी, प्रोफेशनल मोड, एआर स्टीकर्स, स्मार्ट मोशन, पॅनोरामा, कॅमेरा फिल्टर्स आदी फिचर्स देण्यात आले आहेत. याच्या मदतीने फोर-के क्षमतेचे चित्रीकरण करता येणार आहे. तर यात १६ मेगापिक्सल्स क्षमतेचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात फिंगरप्रिंट स्कॅनर आदी फिचर्सदेखील देण्यात आले आहेत. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ओरियो या प्रणालीवर चालणारा असून यावर कंपनीचा फनटच ४.० हा युजर इंटरफेस देण्यात आला आहे. तसेच यात ३२६० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी दिलेली आहे.     

टॅग्स :VivoविवोMobileमोबाइल