शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

विवो व्ही ९ युथ एडिशनच्या मूल्यात पुन्हा कपात

By शेखर पाटील | Updated: July 27, 2018 12:20 IST

अवघ्या तीन महिन्यातच याचे मूल्य दुसर्‍यांदा कमी करण्यात आले आहे.

विवो कंपनीने आपल्या व्ही ९ या स्मार्टफोनच्या युथ एडिशनमध्ये पुन्हा एकदा कपात जाहीर केली आहे. स्मार्टफोनच्या वाढत्या स्पर्धेमुळे स्मार्टफोन कंपन्यांना आपल्या विविध मॉडेल्सच्या मूल्यात वारंवार कपात करावी लागत आहे. या अनुषंगाने विवो व्ही ९ युथ एडिशनच्या मूल्यात कपात करण्यात आली आहे. 

एप्रिल महिन्यात हे मॉडेल १८,९९९ रूपयात लाँच करण्यात आले होते. यानंतर जून महिन्याच्या अखेरीस याचे मूल्य एक हजाराने कमी करण्यात आले होते. आता यात पुन्हा एकदा हजार रूपयांची कपात करण्यात आलेली आहे. यामुळे आता हा स्मार्टफोन १६,९९९ रूपये मूल्यात ग्राहकांना खरेदीसाठी उपलब्ध करण्यात आलेला आहे. म्हणजे अवघ्या तीन महिन्यातच याचे मूल्य दुसर्‍यांदा कमी करण्यात आले आहे.

या स्मार्टफोनमध्ये ६.३ इंच आकारमानाचा डिस्प्ले फुल एचडी प्लस अर्थात २२८० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा आहे. यावर कॉर्नींग गोरीला ग्लास ३ चे संरक्षक आवरण प्रदान करण्यात आले आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन ४५०  प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. आहे. तर यातील बॅटरी ३२६० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी आहे.

विवो व्ही ९ युथ या स्मार्टफोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. याच्या अंतर्गत मागील बाजूस १६ आणि २ मेगापिक्सल्स क्षमतांचे दोन कॅमेरे आहेत. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यामध्ये १६ मेगापिक्सल्स क्षमतेचा फ्रंट कॅमेरा आहे. हे मॉडेल अँड्रॉइडच्या ओरियो या प्रणालीवर चालणारा असून यावर कंपनीचा फनटच ४.० हा युजर इंटरफेस देण्यात आला आहे. 

टॅग्स :Vivoविवोtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइल