शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

भन्नाट 50MP Selfie Camera सह Vivo V23e 5G Phone होऊ शकतो लाँच; व्हिडीओ झाला लीक  

By सिद्धेश जाधव | Updated: November 1, 2021 12:26 IST

Upcoming Vivo 5G Phone Vivo V23e Price Launch Details: लाँच होण्याआधीच Vivo V23e hands-on video इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. या लीकमधून या फोनमधील 50MP Selfie Camera सेन्सरची माहिती समोर आली आहे.

सेल्फी कॅमेरा सेंट्रिक स्मार्टफोन्स सादर करणे विवोची खासियत आहे. असाच एक स्मार्टफोन कंपनी आपल्या ‘वी’ सीरीज अंतर्गत Vivo V23e 5G Phone नावाने सादर करू शकते. गेले कित्येक दिवस लिक्स आणि रिपोर्ट्समधून समोर आलेल्या या फोनच एक व्हिडीओ लीक झाला आहे. लाँच होण्याआधीच Vivo V23e hands-on video इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधून फक्त लुक आणि डिजाईनची नव्हे तर स्पेसिफिकेशन्सची देखील माहिती मिळाली आहे.  

Vivo V23e ची डिजाईन 

समोर आलेल्या व्हिडीओनुसार विवो वी23ई स्मार्टफोन वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेसह लाँच केला जाईल. हा ओएलईडी डिस्प्ले असेल, तसेच यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल. फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल फोनच्या उजवीकडे वॉल्यूम रॉकर आणि पॉवर बटन मिळेल. तर तळाला यूएसबी टाईप सी पोर्ट, स्पिकर ग्रिल व सिम स्लॉट आहे. 

Vivo V23e चे स्पेसिफिकेशन्स 

Vivo V23e 5G Phone मध्ये अँड्रॉइड 12 आधारीत फनटच 12 ओएस आहे. तसेच विवो फोनमधील 4030एमएएचची बॅटरी 44वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह सादर केली जाईल. फोनच्या बॅक पॅनलवर आलेल्या कॅमेरा सेटअप 64MP चा प्रायमरी रियर सेन्सर, 8MP चा सेकंडरी सेन्सर आणि 2MP ची मॅक्रो लेन्स मिळेल. या फोनमधील 50MP Selfie कॅमेरा सेन्सर या फोनचा आकर्षण बिंदू ठरू शकतो.  

Vivo V23e ची किंमत  

हा फोन सर्वप्रथम व्हियेतनाममध्ये सादर केला जाईल. लीकनुसार हा फोन पुढील आठवड्यात दाखल होईल. तिथे या फोनची किंमत 10,000,000 VND असू शकते, असे सांगण्यात आले आहे. ही किंमत भारतीय चलनात 32,000 रुपयांच्या आसपास आहे.  

टॅग्स :VivoविवोSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान