6000mAh बॅटरीसह आला Vivo चा दणकट स्मार्टफोन; किंमतही आहे परवडणारी  

By सिद्धेश जाधव | Published: May 30, 2022 12:21 PM2022-05-30T12:21:44+5:302022-05-30T12:22:56+5:30

Vivo T2x स्मार्टफोन Dimensity 1300 SoC, 6000mAh बॅटरी, 44W फास्ट चार्जिंग आणि 8GB RAM सह बाजारात आला आहे.  

Vivo T2x Launched With 50MP Camera 6000mAh Battery   | 6000mAh बॅटरीसह आला Vivo चा दणकट स्मार्टफोन; किंमतही आहे परवडणारी  

6000mAh बॅटरीसह आला Vivo चा दणकट स्मार्टफोन; किंमतही आहे परवडणारी  

Next

Vivo T2x स्मार्टफोन अधिकृत लाँच पूर्वीच चिनी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म JD.com वर लिस्ट करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची बुकिंग सुरु झाली आहे आणि 12 जूनपासून विक्री सुरु होईल. Vivo T2x स्मार्टफोनमध्ये Dimensity 1300 SoC, 6000mAh बॅटरी, 44W फास्ट चार्जिंग आणि 8GB RAM मिळतो. चला जाणून घेऊया या नव्या विवो स्मार्टफोनची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स.  

Vivo T2x स्पेसिफिकेशन्स 

Vivo T2x स्मार्टफोनमध्ये 6.58-इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 144Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 650 निट्स पीक ब्राईटनेसला सपोर्ट करतो. कंपनीनं यात MediaTek Dimensity 1300 SoC प्रोसेसरची पावर दिली आहे. सोबत 8GB पर्यंत LPDDR4X RAM रॅम आणि 256GB पर्यंतची UFS 3.1 स्टोरेज मिळते. हा हँडसेट अँड्रॉइड 12 आधारित फनटच ओएसवर चालतो.  

Vivo T2x स्मार्टफोनच्या मागे ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी कंपनीनं 16MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. पावर बॅकअपसाठी या विवो स्मार्टफोनमध्ये 6000mAh ची मोठी बॅटरी मिळते, जी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन फक्त 30 मिनिटांत 50% चार्ज होतो. Vivo T2x स्मार्टफोन मिस्ट ब्लू आणि मिरर ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे.  

Vivo T2x ची किंमत 

Vivo T2x स्मार्टफोनच्या 8GB रॅम व 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 1699 युआन (सुमारे 19,800 रुपये) ठेवण्यात आली आहे. तर 8GB रॅम व 256GB स्टोरेज असलेला हायएन्ड व्हेरिएंट 1899 युआन (सुमारे 22,100 रुपये) मध्ये विकत घेता येईल.  

Web Title: Vivo T2x Launched With 50MP Camera 6000mAh Battery  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.