शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
6
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
7
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
8
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
9
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
10
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
11
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
12
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
15
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
16
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
17
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
18
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
19
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
20
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा

विवोने सादर केले दोन नवीन 5G Phone; जबरदस्त Vivo T1 5G आणि Vivo T1x 5G झाले लाँच  

By सिद्धेश जाधव | Updated: October 21, 2021 12:34 IST

Vivo T1 and Vivo T1x 5G Phone Price Specs and Details: Vivo T1 5G आणि Vivo T1x 5G हे दोन नवीन 5G Phone सादर करण्यात आले आहेत. ही सीरिज सध्या चीनमध्ये सादर करण्यात आली आहे, लवकरच हे फोन्स भारतासह जागतिक बाजारात दाखल होऊ शकतात.

विवोने आपली नवीन ‘टी1’ सीरीज सादर केली आहे. या सीरीज अंतर्गत Vivo T1 5G आणि Vivo T1x 5G हे दोन नवीन 5G Phone सादर करण्यात आले आहेत. ही सीरिज सध्या चीनमध्ये सादर करण्यात आली आहे, लवकरच हे फोन्स भारतासह जागतिक बाजारात दाखल होऊ शकतात. कंपनीने यात 12GB RAM आणि 5,000mAh battery असे स्पेसिफिकेशन्स दिले आहेत.  

Vivo T1 5G 

विवो टी1 5जी स्मार्टफोन 6.57 इंचाचा फुल-एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 240hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. एक एलसीडी डिस्प्ले आहे. प्रोसेसिंगसाठी कंपनीने यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778जी चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 ओएसवर चालतो. यात 12GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे.  

फोटोग्राफीसाठी Vivo T1 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स मिळते. सिक्योरिटीसाठी साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. हा फोन 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. 

Vivo T1x 5G 

हा फोन 6.53 इंचाच्या फुल-एचडी+ डिस्प्लेसह बाजारात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यात मीडियाटेक डिमेनसिटी 900 ची प्रोसेसिंग पॉवर कंपनीने दिली आहे. यात 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. हा डिवाइस अँड्रॉइड 11 वर चालतो. Vivo T1x 5G स्मार्टफोनमध्ये 64-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यातील 5,000एमएएचची बॅटरी 44 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

Vivo T1 आणि T1x ची किंमत 

  • Vivo T1 5G 8GB/128GB: 1999 युआन (अंदाजे 21,000 रुपये)  
  • Vivo T1 5G 8GB/256GB: 2199 युआन (अंदाजे 25,700 रुपये)  
  • Vivo T1 5G 12GB/256GB: 2,499 युआन (अंदाजे 29,000 रुपये)  
  • Vivo T1x 5G 6GB/ 128GB: 1699 युआन (अंदाजे 19,800 रुपये)  
  • Vivo T1x 5G 8GB/128GB: 1,799 युआन (अंदाजे 21,100 रुपये)  
  • Vivo T1x 5G 8GB/256GB: 1,999 युआन (अंदाजे 23,400 रुपये) 
टॅग्स :VivoविवोSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान