शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Vivo फॅन्ससाठी खुशखबर! पुढील आठवड्यात लाँच होणार पॉवरफुल स्मार्टफोन, लाँचपूर्वीच माहिती मिळाली माहिती  

By सिद्धेश जाधव | Updated: December 17, 2021 15:16 IST

Vivo S12 Launch: हा एक सेल्फी सेंट्रिक फोन असेल. Vivo S12 च्या फ्रंटला 44 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर मिळेल.

Vivo येत्या 22 डिसेंबरला आपली ‘विवो एस12’ सीरीज सादर करणार आहे. या सीरिजमध्ये Vivo S12 आणि Vivo S12 Pro हे दोन स्मार्टफोन लाँच केले जातील. आतापर्यंत तुकड्या तुकड्यांमध्ये या फोन्सची माहिती समोर आली होती. परंतु आता सीरिज Vivo S12 च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीची देखील माहिती मिळाली आहे. 

Vivo S12 चे लीक स्पेसिफिकेशन्स 

सर्वप्रथम या फोनचा फोटोग्राफी सेगमेंट पाहू कारण हा एक सेल्फी सेंट्रिक फोन असेल. Vivo S12 च्या फ्रंटला 44 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर मिळेल. सेकंडरी सेन्सरचा वापर ग्रुप सेल्फीमध्ये जास्त माणसं समाविष्ट करण्यासाठी करता येईल. तसेच फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाईल. ज्यात 108 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर असेल.  

Vivo S12 स्मार्टफोन 6.44 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह बाजारात येईल. फोनच्या हॉरीझॉन्टल नॉचमध्ये दोन सेल्फी कॅमेरे देण्यात येतील. हा अ‍ॅमोलेड डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. हा फोन अँड्रॉइड 11 सह ओरिजनओएस ओशियन युआय वर चालेल. प्रोसेसिंगसाठी विवो एस12 मध्ये मीडियाटेकचा डिमेनसिटी 1100 चिपसेट दिला जाऊ शकतो. त्याचबरोबर 12 जीबी पर्यंतचा रॅम दिली जाईल. पॉवर बॅकअपसाठी Vivo S12 मध्ये 44वॉट फास्ट चार्जिंगसह 4,200एमएएचची बॅटरी मिळेल. 

Vivo S12 ची किंमत 

Vivo S12 चा 8GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट 2999 युआन (सुमारे 35,700 रुपये) मध्ये सादर करण्यात येईल. तर 12GB RAM आणि 256GB स्टोरेजसती 3339 युआन (सुमारे 40,700 रुपये) मोजावे लागतील. हा फोन Shimmering Black, Warm Gold आणि Lake Blue कलरमध्ये खरेदी करता येईल.  

टॅग्स :VivoविवोSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान