शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

Vivo 101 Offer: फक्त 101 रुपयांमध्ये घरी आणा 32,990 रुपयांचा Vivo Phone; जाणून घ्या Diwali Offer 

By सिद्धेश जाधव | Updated: October 28, 2021 17:15 IST

Vivo Phone in 101 Rs Diwali Offer: विवोने दिवाळी ऑफर्सची घोषणा केली आहे. या ऑफर्स अंतर्गत काही निवडक स्मार्टफोन मॉडेल्स फक्त 101 रुपये देऊन घरी आणता येतील.  

दिवाळी जवळ आली आहे आणि स्मार्टफोन कंपन्यांनी ऑफर्स सादर करण्यास सुरुवात केली आहे. Vivo ने एका नवीन ऑफरची घोषणा केली आहे, ज्यात ग्राहक या दिवाळीत फक्त 101 रुपये देऊन एक Vivo phone विकत घेऊ शकतात. ही ऑफर Vivo V आणि Y-सीरिजच्या स्मार्टफोन्सवर वैध असेल, असे सांगण्यात आले आहे.  

नवीन ऑफर ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्लॅटफॉर्म्सवर 7 नोव्हेंबर 2021 पर्यंत उपलब्ध असेल. तसेच दिवाळी ऑफर्स अंतर्गत Vivo X70 सीरिजवर देखील बँक ऑफर्स मिळतील. या Vivo X70 सीरिजचे स्मार्टफोन विकत घेण्यासाठी सिटी, आयसीआयसीआय, कोटक महिंद्रा, आयडीएफसी फर्स्ट आणि एचडीबी बँकेच्या कार्डवर 10 टक्क्यांपर्यंतचा कॅशबॅक मिळेल.  

कंपनीने X70 सीरिज, V21 5G आणि V21E 5G स्मार्टफोनवर वन टाइम स्क्रीन रिप्लेसमेंटची घोषणा केली आहे. Zest Money चा वापर करून ग्राहक एक वर्षाची अतिरिक्त वॉरंटी देखील मिळवू शकतात. तसेच रिलायन्स जियोकडून 10,000 रुपयांचे बेनिफिट देखील दिले जात आहेत.  

या सर्व दिवाळी ऑफर्समध्ये सर्वात आकर्षक ऑफर म्हणजे 101 रुपयांमध्ये Vivo phone विकत घेण्याची ऑफर आहे. या ऑफर अंतर्गत फक्त Vivo V21, Vivo Y73 आणि Vivo Y33s हे स्मार्टफोन घरी आणता येतील. तसेच यासाठी बजाज फायनान्स सर्व्हिसचा वापर करावा लागेल. म्हणजे 15,000 रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा स्मार्टफोन 101 रुपये देऊन घरी आणता येईल आणि उर्वरित रक्कम सहा महिन्यांच्या हप्त्यांवर द्यावी लागेल.  

याव्यतिरिक्त ग्राहक Vivo V आणि Y सीरिजच्या स्मार्टफोन्सवर 2,500 रुपयांचा कॅशबॅक मिळवू शकतात. यासाठी ICICI, Kotak Mahindra, IDFC First आणि HDB बँकेच्या कार्ड्सचा वापर फोन खरेदी करताना करावा लागेल. 

ऑफर्स असलेल्या Vivo Phones ची किंमत  

  • Vivo X70 Pro 8GB/128GB: 46,990 रुपये  
  • Vivo X70 Pro 8GB/256GB: 49,990 रुपये  
  • Vivo X70 Pro 12GB/256GB: 52,990 रुपये  
  • Vivo X70 Pro+: 79,990 रुपये  
  • Vivo V21 8GB/128GB: 29,990 रुपये  
  • Vivo V21 8GB/256GB: 32,990 रुपये  
  • Vivo V21e: 24,990 रुपये  
  • Vivo Y73 : 17,990 रुपये  
टॅग्स :VivoविवोSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान