शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

युएसबी ३.२ ठरणार गतीमान माहितीच्या वहनासाठी उपयुक्त

By शेखर पाटील | Updated: August 8, 2017 17:28 IST

युएसबी ३.२ या नवीन मानकाची घोषणा करण्यात आली असून याच्या मदतीने अत्यंत गतीमान पध्दतीने माहितीचे आदान-प्रदान शक्य होणार आहे.

युएसबी ३.२ या नवीन मानकाची घोषणा करण्यात आली असून याच्या मदतीने अत्यंत गतीमान पध्दतीने माहितीचे आदान-प्रदान शक्य होणार आहे. विविध कंपन्यांचा समावेश असणार्‍या युएसबी ३.० प्रमोटर ग्रुपतर्फे युएसबी ३.२ या कनेक्टरच्या आगमनावर आता शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. खरं तर अलीकडच्या काळात युएसबी टाईप-सी हा प्रकार मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झालेला आहे. याच्या दोन्ही बाजूंना कनेक्टव्हिटीची सुविधा असून ते विविध उपकरणांमध्ये चार्जींगसह माहितीच्या वहनासाठी वापरले जाते. हेडफोन जॅकला पर्याय म्हणूनही उपयुक्त ठरले आहे. आणि आता याचीच आधुनिक आवृत्ती असणार्‍या युएसबी ३.२ची घोषणा करण्यात आली असून हे माहितीच्या अत्यंत गतीमान आदान-प्रदान करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. यात आधीच्या म्हणजेच युएसबी ३.१ पेक्षा दुप्पट गतीने माहितीचे वहन केले जाते. आधीच्या मानकात ५ जीबीच्या दोन मार्गांमधून १० जीबी इतक्या गतीने डाटा वहन होते. तर युएसबी ३.२ या मध्ये १० जीबी क्षमतेचे दोन मार्ग (लेन) देण्यात आले असून अर्थातच याच्या मदतीने २० जीबी प्रति सेकंद इतक्या गतीने माहितीचे आदान-प्रदान होऊ शकते. म्हणजेच आधीच्या मानकापेक्षा हे दुप्पट गतीमान आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे हे कनेक्टर युएसबी टाईप-सी केबलच्याच मदतीने माहितीचे वहन करू शकेल.

सध्या विविध उपकरणांच्या स्टोअरेजच्या क्षमतेच मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून या अनुषंगाने माहितीच्या वहनाचा वेगदेखील वाढणे अपेक्षित आहे. या अनुषंगाने युएसबी ३.२ या मानकाचे कनेक्टर अतिशय महत्वपूर्ण आणि खरं तर काळाची गरज आहे. अर्थात याचा वापर करण्यासाठी याच्याशी सुसंगत अशा उपकरणांची आवश्यकता भासणार आहे. आता युएसबी ३.२ची घोषणा झाल्यानंतर आगामी स्मार्टफोनादी उपकरणांमध्ये याची कनेक्टीव्हिटी देण्यात येईल हे स्पष्ट झाले आहे.