शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

#Welcome 2018 : नवीन वर्षात लाँच होतील, असे काही स्मार्टफोन्स !

By ravalnath.patil | Updated: December 28, 2017 18:17 IST

2018 मध्ये स्मार्टफोन मार्केटमध्ये काय घडणार याकडे पाहणे रोमांचक ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर आम्ही 2018 मध्ये मार्केटमध्ये येतील असे अपेक्षित असलेले काही स्मार्टफोन्स आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. 

ठळक मुद्देसरत्या वर्षात अनेक बझल-लेस आणि ड्युअल कॅमेरा असलेले स्मार्टफोन मार्केटमध्ये आले.आता नवीन वर्षात म्हणजेच 2018 मध्ये येणा-या नवनवीन स्मार्टफोन्सकडे ग्राहकांची नजर 2018 मध्ये स्मार्टफोन मार्केटमध्ये काय घडणार याकडे पाहणे रोमांचक ठरणार

मुंबई : 2017 या सरत्या वर्षात अनेक बझल-लेस आणि ड्युअल कॅमेरा असलेले स्मार्टफोन भारतीय मार्केटमध्ये आले.  या वर्षात मोठ्या प्रमाणात स्मार्टफोन्सला ग्राहकांनी पसंती दर्शविली, तर काही स्मार्टफोन्सना तांत्रिक अडचणीमुळे फटका बसल्याचे दिसून आले. आता नवीन वर्षात म्हणजेच 2018 मध्ये येणा-या नवनवीन स्मार्टफोन्सकडे ग्राहकांची नजर आहे. त्यामुळे 2018 मध्ये स्मार्टफोन मार्केटमध्ये काय घडणार याकडे पाहणे रोमांचक ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर आम्ही 2018 मध्ये मार्केटमध्ये येतील असे अपेक्षित असलेले काही स्मार्टफोन्स आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. 

Nokia 9  :नोकिया 9  मध्ये क्वालकॉम प्लॅगशिप स्नॅपड्रगन 835 प्रोसेसरसह 4 जीबी रॅम असणार आहे. तसेच, अॅड्रेनो 540 जीपीयू आणि 64 जीबी इनबिल्ट स्टोरेज असल्याचे समजते. गेल्या काही दिवसांपूर्वी नोकिया 9 च्या रॅमचे प्रकार लिक झाले होते. यावेळी 6 जीबी आणि 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल मेमेरी असल्याचे संकेत देण्यात आले होते. दरम्यान, यामध्ये Carl-Zeiss optics असणारे सर्वात मोठे यूएसपी डिव्हाईससह ड्युअल कॅमे-याचा सेट-अप असणार आहे. कॅमेरा 12 मेगापिक्सल युनिटचा असेल.  याचबरोबर नोकिया आता बझल-लेस डिस्प्लेच्या रेसमध्ये उडी घेणार नसल्याचे समजते. तर, नोकिया 9 या स्मार्टफोनमध्ये ऑपरेटिंग सिस्टिम अॅन्ड्राईडची लेटेस्ट Oreo 8.0. असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच, वॉटर आणि डस्टपासून संरक्षण करण्याचे फिचर्स असण्याची शक्यता आहे. 

Nokia 6 :शाओमी आणि मोटोरोलाला टक्कर देण्यासाठी नोकिया मध्यम श्रेणीतील स्मार्टफोन मार्केटमध्ये आगामी वर्षात आणण्याच्या तयारीत आहे. नोकिया 6 या नावाने हा स्मार्टफोन येण्याची शक्यता असून यामध्ये स्नॅपड्रगन 630 चिपसेट असणार आहे. या चिपसेटमध्ये 4 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेज मेमरी असणार आहे.

Samsung's Galaxy S9 and Galaxy S9+ :सॅमसंग कंपनीचे स्मार्टफोन फ्लॅगशिपमध्ये घेण्यासाठी ग्राहक उतावळे झालेले आपण पाहिलेच असेल. मात्र, सॅमसंग गॅलेक्सी एस 9 आणि गॅलेक्सी एस 9 प्लस मार्केटमध्ये आणण्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. तरी सुद्धा हे दोन्ही स्मार्टफोन मार्केटमध्ये येतील अशी चर्चा सध्या सोशल मीडियात सुरु आहे. सध्या मार्केटमध्ये  सॅमसंग गॅलेक्सी एस 8 आणि गॅलॅक्सी एस 8 प्लस स्मार्टफोन उपलब्ध आहेत. 

OnePlus 6 :वन प्लस ही चीनची कंपनी आहे. या कंपनीच्या वन प्लस 6 या स्मार्टफोनबाबत मार्केटमध्ये जास्त चर्चा नसली, तरी सुद्धा या स्मार्टफोनची माहिती सर्रास ग्राहकांकडे असल्याचे दिसून येते. वन प्लस 6 हा स्मार्टफोन येत्या मार्च 2018 मध्ये भारतीय मार्केटमध्ये येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या महिन्यात कंपनी वन प्लस 5 टी हा स्मार्टफोन भारतीय मार्केटमध्ये घेऊन आली होती. 

Xiaomi Mi 7 :शाओमी Mi 7 हा स्मार्टफोन नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच जानेवारी 2018 मध्येच लॉंच होणार असल्याची शक्यता आहे. स्पोर्ट स्नॅपड्रगन 845 चिपसेट असलेला हा पहिलाच स्मार्टफोन मार्केटमध्ये येणार आहे. तसेच, यामध्ये 6 जीबी रॅम आणि 3350mAH क्षमतेची बॅटरी असल्याचे सांगण्यात येत आहे. याचबरोबर अनेक नवीन फिचर्ससोबत वायर-लेस चार्जिंग करतात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाओमी Mi 7 स्मार्टफोनची किंमत 26, 600 रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे. 

Redmi Note 5 :शाओमी कंपनीचा रेडमी नोट 5 असा स्मार्टफोन आहे की, त्याच्या अफवा अनेकदा सोशल मीडियावर धडकतात. गेल्या काही दिवसांपूर्वी चीनच्या सोशल नेटवर्क वेइबोवर या स्मार्टफोनचे फोटोस् लीक करण्यात आले होते. हा स्मार्टफोन रेडमी नोट 4 सारखाचं असल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान, रेडमी नोट 4 हा स्मार्टफोन तीन विविध व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आला आहे. या सर्व व्हेरियंटमध्ये 5.5 इंच आकारमानाचा आणि 1920 बाय 1080 पिक्सल्स म्हणजे फुल एचडी क्षमतेचा 2.5 डी वक्राकार डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच, ऑक्टॉ-कोअर स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसर आहे.

iPhone(s) (2018) :भारतीय मोबाईल मार्केटमध्ये गेल्या काही दिवसांपासून अ‍ॅपल कंपनीच्या बहुचर्चित आयफोन-8, आयफोन-8 प्लस, आयफोन X या स्मार्टफोन्सची विक्री सुरू झाली आहे. आता कंपनी नवीन वर्षात आयफोन X मधील काही तीन वेरिएंट स्मार्टफोन मार्केटमध्ये आणण्याची शक्यता आहे. या वेरिएंट मॉडेलची डिसाईन सध्याच्या आयफोन X सारखीच असणार आहे. मात्र, काही अद्यावत फिचर्स असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.  

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइल