शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

ओप्पो ए७५ व ए७५एसचे अनावरण

By शेखर पाटील | Updated: December 27, 2017 20:05 IST

ओप्पो कंपनीने ए७५ आणि ए७५एस हे दोन नवीन स्मार्टफोन जागतिक बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून याचे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे.

ओप्पो कंपनीने ए७५ आणि ए७५एस हे दोन नवीन स्मार्टफोन जागतिक बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून याचे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे.

ओप्पो ए७५ व ए७५एस या दोन्ही मॉडेल्समध्ये स्टोअरेजच्या क्षमतेचा अपवाद वगळता अन्य सर्व फिचर्स समान आहेत. ओप्पो ए७५ या मॉडेलमध्ये  ६ इंच आकारमानाचा, फुल एचडी प्लस (१०८० बाय २१६० पिक्सल्स) क्षमतेचा आणि एलसीडी या प्रकारचा डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा अस्पेक्ट रेशो १८:९ असा आहे. यात मीडियाटेक हेलिओ पी२३ हा प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम ४ जीबी व स्टोअरेज ३२ जीबी आहे. तर ओप्पो ए७५एस मॉडेलची रॅम ४ जीबी व स्टोअरेज ६४ जीबी असेल. या दोन्ही व्हेरियंटचे स्टोअरेज मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे.

या दोन्ही स्मार्टफोनमध्ये एलईडी फ्लॅशसह १६ मेगापिक्सल्सचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी २० मेगापिक्सल्स क्षमतेचा कॅमेरा असेल. दोन्ही मॉडेल्समध्ये ३,२०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. तर हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर आधारित कलर ओएस ३.२ या प्रणालीवर चालणारा असेल. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तर यात अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत. 

पहिल्यांदा हे स्मार्टफोन तैवानमधील ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहेत. भारतीय चलनानुसार यांचे मूल्य २३ ते २५ हजारांच्या दरम्यान आहे. लवकरच अन्य राष्ट्रांमध्येही याला लाँच करण्यात येईल असे मानले जात आहे. 

टॅग्स :oppoओप्पोMobileमोबाइल