शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

CoWIN डेटा लीक प्रकरणाची केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं केली चौकशी, सत्य काय ते सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2021 15:43 IST

कोरोना लसीकरणासाठी तयार करण्यात आलेले CoWin हे डिजिटल व्यासपीठ हॅक करण्यात आल्याचा दावा करणाऱ्या काही पोस्ट गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात व्हायरल झाल्या होत्या.

कोरोना लसीकरणासाठी तयार करण्यात आलेले CoWin हे डिजिटल व्यासपीठ हॅक करण्यात आल्याचा दावा करणाऱ्या काही पोस्ट गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात व्हायरल झाल्या होत्या. केंद्र सरकारनं याची दखल घेऊन संबंधित सर्व दावे खोटे आणि निराधार असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. 

कोविन अॅपमधून डेटा लीक होत असल्याची माहिती सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. याबाबत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि एम्पावर्ड ग्रूप ऑन व्हॅक्सीन अॅडमिनिस्ट्रेशननं (EGVAC) याबाबत चौकशी करण्याच्या मागणीनं जोर धरला होता. अखेर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं याबाबत एक पत्रक जारी करुन सर्व दावे फेटाळून लावले आहेत. 

CoWIN सिस्टमची माहिती डार्क वेबवर लीक करण्यात आल्याचा दावा पूर्णपणे खोटा असून आरोग्य मंत्रालय आणि एम्पावर्ड ग्रूप ऑन व्हॅक्सीन अॅडमिनिस्ट्रेशन याचा पूर्णपणे तपास केला आहे. CoWIN मधून कोणताही डेटा लीक झालेला नाही, असं ट्विट केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं केलं आहे. याउलट कोविनच्या तांत्रिक प्रणालीवर २४ तास नजर ठेवली जात असून सातत्यानं कोविनच्या सुरक्षीततेबाबत माहिती घेतली जात असते. जेणेकरुन प्रत्येक युझरचा डेटा सुरक्षित राहू शकेल, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. 

CoWIN सिस्टमच्या कथिक हॅक होण्याच्या वृत्ताची दखल घेऊन इलेक्ट्रॉनिक्स आणि सूचना प्राद्योगिकी मंत्रलयानं कॉम्प्युटर इमरजंसी रिस्पॉन्स टीमच्या माध्यमातून याची तपासणी करण्यात आली. यात CoWIN पूर्णपणे सुरक्षित असल्याचं निदर्शनास आलं आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. 

"CoWIN सिस्टम हॅक होणं आणि डेटा लीकवरुन डार्क वेबवर अस्तित्वात असलेल्या कथिक हॅकर्सचे दावे आधारहीन आहेत. आम्ही सातत्यानं कोविनच्या सुरक्षेबाबत काळजी घेत असतो", असं एम्पावर्ड ग्रूप ऑन व्हॅक्सीन अॅडमिनिस्ट्रेशनचे चेअरमन डॉ. आर.एस.शर्मा यांनी सांगितलं. दरम्यान, ९ जून रोजी ट्विटर आणि इतर सोशल मीडिया माध्यमांमध्ये CoWIN सिस्टमचा डेटा लीक झाल्याचा दावा करणाऱ्या पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. यात युझरचा फोन नंबर, नाव, इमेल इत्यादी माहिती लीग झाल्याचं सांगण्यात येत होतं.  

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याtechnologyतंत्रज्ञान