शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

अल्टीमेट इअर्स कंपनीचा मेगाबूम वायरलेस स्पीकर

By शेखर पाटील | Updated: November 21, 2017 18:30 IST

अल्टीमेट इअर्स या अमेरिकन कंपनीने आधी भारतीय बाजारपेठेत बूम हा स्पीकर सादर केला होता. आता याचीच पुढील आवृत्ती मेगाबूमच्या माध्यमातून लाँच करण्यात आली आहे

ठळक मुद्देनावातच नमूद असल्यानुसार हा स्पीकर उच्च ध्वनीसाठी विकसित करण्यात आला आहेविशेष करून आऊटडोअर पार्टीजसाठी याचा वापर करणे शक्य असल्याचे कंपनीने नमूद केले आहेयात गुगल असिस्टंट आणि सिरी या दोन्ही व्हाईस कमांडवर आधारित प्रणालींचा सपोर्ट देण्यात आला आहे

अल्टीमेट इअर्स कंपनीने आपल्या मेगाबूम हा प्रिमीयम वायरलेस स्पीकर लाँच करण्याची घोषणा केली आहे.

अल्टीमेट इअर्स या अमेरिकन कंपनीने आधी भारतीय बाजारपेठेत बूम हा स्पीकर सादर केला होता. आता याचीच पुढील आवृत्ती मेगाबूमच्या माध्यमातून लाँच करण्यात आली आहे. नावातच नमूद असल्यानुसार हा स्पीकर उच्च ध्वनीसाठी विकसित करण्यात आला आहे. विशेष करून आऊटडोअर पार्टीजसाठी याचा वापर करणे शक्य असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. यात गुगल असिस्टंट आणि सिरी या दोन्ही व्हाईस कमांडवर आधारित प्रणालींचा सपोर्ट देण्यात आला आहे. परिणामी कुणीही याला अँड्रॉइड आणि आयओएस स्मार्टफोनला कनेक्ट करून ध्वनी आज्ञावलीवर आधारित विविध फंक्शन्स कार्यान्वित करू शकतो. यात ३६० अंशातील हाय-रेझोल्युशन ध्वनीची निर्मीती होत असल्याचे कंपनीने सांगितले आहे. अर्थात या माध्यमातून अतिशय उत्तम दर्जाच्या ध्वनीची अनुभुती घेता येणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. याला कुणीही आपला स्मार्टफोन कनेक्ट करू शकतो. तसेच याच्या कार्यान्वयासाठी स्वतंत्र अ‍ॅपदेखील सादर करण्यात आले आहे.

मेगाबूम हा वायरलेस स्पीकर आयपीएक्स७ या मानकावर आधारित म्हणजेच वॉटरप्रूफ आहे. यामुळे याला पावसातही वापरणे शक्य आहे. तसेच यातील बॅटरी उत्तम दर्जाची असून ती एकदा चार्ज केल्यानंतर दीर्घ काळापर्यंत टिकत असल्याचा कंपनीचा दावा आहे. तसेच यातील ब्ल्यु-टुथची रेंजही अन्य मॉडेल्सच्या तुलनेत चांगली असल्याचे सांगण्यात आले आहे. मेगाबूम वायरलेस स्पीकर भारतीय ग्राहकांना १९,९९५ रूपयात उपलब्ध करण्यात आला आहे. भारतीय बाजारपेठेत आता अनेक वायरलेस स्पीकर लाँच करण्यात आली असून यात सातत्याने भर पडत आहे. मात्र यातील बहुतांश मॉडेल्स हे अत्यंत किफायतशीर दरातील आहेत. काही स्पीकर तर अगदी हजार रूपयांपासून उपलब्ध आहेत. या पार्श्‍वभूमिवर मेगाबूम हे मॉडेल प्रिमीयम या प्रकारातील असल्यामुळे याला नेमका कसा प्रतिसाद लाभतो याकडे लक्ष लागून आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञान