शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

पैसे द्या आणि करा ट्विट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2017 21:07 IST

ट्विटरच्या नव्या योजनेनुसार यासाठी प्रतिमहिना 99 डॉलर्स म्हणजेच जवळपास 6,350 रुपयांची मेंम्बरशिप घ्यावी लागणार आहे

ठळक मुद्देट्विटरच्या नव्या योजनेनुसार यासाठी प्रतिमहिना 99 डॉलर्स म्हणजेच जवळपास 6,350 रुपयांची मेंम्बरशिप घ्यावी लागणार ज्यांची निवड ट्विटरकडून करण्यात येईल त्यांनाच ही सुविधा मिळणार आहे.सध्या याची चाचणी सुरु आहे

मुंबई, दि. 29 - जर तुम्हाला तुमचं ट्विट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल, म्हणजे अनोळखी लोकांच्याही टाईमलाईनवर ते दिसावं असं वाटत असेल तर ते आता शक्य होणार आहे. यासाठी ट्विटर एक नवी योजना आणत असून याचा अनेकांना फायदा होणार आहे. ट्विटरच्या नव्या योजनेनुसार यासाठी प्रतिमहिना 99 डॉलर्स म्हणजेच जवळपास 6,350 रुपयांची मेंम्बरशिप घ्यावी लागणार आहे. ही मेम्बरशिप घेतल्यानंतर ट्विटर तुमचं ट्विट व्हायरल करण्यासाठी मदत करणार आहे. सध्या याची चाचणी सुरु आहे. मात्र ही मेम्बरशिप सर्वांसाठी उपलब्ध असणार नाही. ज्यांची निवड ट्विटरकडून करण्यात येईल त्यांनाच ही सुविधा मिळणार आहे. 

ट्विटरने शुक्रवारी एक ब्लॉग पोस्ट करत सांगितलं आहे, जाहिरातीसाठी वेगळं ट्विट करण्याची गरज नाही. याआधी ज्याप्रमाणे तुम्ही ट्विट करत होता, तसंच साध्या पद्धतीने ट्विट करायचं आहे. त्यामध्ये लिंक, टॅग वैगेरे करु शकता. यानंतर ट्विटर स्वत:हून तुमच्या ट्विटची जाहिरात करण्यास सुरुवात करेल. 

अनेक लोकांना किंवा छोट्या कंपन्यांना आपली जाहिरात करायची असते. मात्र यासाठी सोशल मीडियावर जास्त पैसे खर्च करणं त्यांना परवडणार नसतं. अशा लोकांसाठी आणि छोट्या कंपन्यांसाठी ट्विटर ही योजना आणत आहे.