शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

शॉर्ट टर्म लोनचं लालूच पडेल महागात, रिकामी होईल तुमचं अकाऊंट; 'हे' Apps अजिबात वापरू नका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 18:56 IST

जर तुम्ही शॉर्ट टर्म लोनच्या बाबतीत कोणतेही अ‍ॅप डाउनलोड केलं असेल तर ते तुम्हाला महागात पडू शकतं.

जर तुम्ही शॉर्ट टर्म लोनच्या बाबतीत कोणतेही अ‍ॅप डाउनलोड केलं असेल तर ते तुम्हाला महागात पडू शकतं. कारण चिनी घोटाळेबाज आता तुमच्या फोनमध्ये प्रवेश करून तुमचा डेटा चोरत आहेत आणि तुमचं खातं रिकामं करत आहेत. देशातील प्रत्येक ५ पैकी एका व्यक्तीनं चायनीज लोन अ‍ॅप डाउनलोड केलं आहे. ही संख्या सातत्यानं वाढत आहे. जर तुम्हीही असे शॉर्ट टर्म लोन अ‍ॅप डाउनलोड केलं असेल तर ते कसं टाळता येईल हे जाणून घेणं महत्वाचं आहे. 

या अ‍ॅपद्वारे चिनी सायबर क्राइम करणारे जबरदस्तीने तुमच्या बँकेत पैसे पाठवतात. यानंतर, तुमच्या खात्याचा तपशील घेऊन तुमचं खातं रिकामं करतात. अनेकदा अल्पमुदतीच्या कर्जाच्या लोभापायी लोक यात अडकतात. मग ते कर्ज वसुलीचं कंत्राट भारतीयांना देतात. प्रत्येक अ‍ॅपचे वेगवेगळे रिकव्हरी एजंट असतात. जे तुमच्याकडून कोणत्याही प्रकारे पैसे वसुल करण्यात निष्णात असतात. मग जर तुमचा तपशील त्यांच्याकडे असेल तर ते तुमचे खातं देखील पाहू शकतात.

कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?छोटी-मोठी गरज असली तरी असे कोणतेही अ‍ॅप डाउनलोड करू नका. अशा अ‍ॅप्सपासून नेहमी अंतर ठेवा. जर तुम्ही आधीच डाउनलोड केलं असेल आणि फसवणूक होऊ शकते असा संशय येत असेल तर लगेच तुमचा नंबर बदला. फसवणुकीची तक्रार तुमच्या जवळच्या पोलीस ठाण्यात करा. जेणेकरून पोलिसांना त्यांच्यावर वेळीच कारवाई करता येईल. तुमचं खातं रिकामं करण्याव्यतिरिक्त, चिनी अ‍ॅप्स गॅलरी, पासवर्ड, संपर्क यांसारख्या तुमच्या सर्व वैयक्तिक डिटेल्ससाठी धोकादायक आहेत. हे अ‍ॅप्स डाऊनलोड केल्यानं तुमच्या मोबाईलचा संपूर्ण अ‍ॅक्सेस त्यांना मिळतो. 

पुढील अ‍ॅप्स अजिबात डाऊनलोड करू नका

  • मोबीपॉकेट
  • इन्फिनिटी कॅश
  • Kredit Mango
  • मिनट कॅश
  • गो कॅश
  • कॅश लाइट
टॅग्स :technologyतंत्रज्ञान