शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कमी किंमतीत भन्नाट स्पेसिफिकेशन्ससह Tecno Spark 8 येणार भारतात; पुढील आठवड्यात होऊ शकतो लाँच 

By सिद्धेश जाधव | Updated: September 7, 2021 12:03 IST

Tecno Spark 8 India Launch: Tecno Spark 8 स्मार्टफोन पुढील आठवड्यात भारतात सादर केला जाऊ शकतो. Android 11 Go Edition वर चालणार हा फोन मीडियाटेक हीलियो पी22 प्रोसेसरसह सादर केला जाऊ शकतो.

ठळक मुद्देनायजेरियात Tecno Spark 8 स्मार्टफोनचा एकच व्हेरिएंट आला आहे. या फोनमधील ड्युअल रियर कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 16MP चा मुख्य सेन्सर आणि एक क्यूवीजीए लेन्स देण्यात आली आहे.

गेल्या आठवड्यात जागतिक बाजारात सादर झालेला Tecno Spark 8 स्मार्टफोन लवकरच भारतात सादर केला जाऊ शकतो. Tecno Spark 7 चा हा अपग्रेड व्हर्जन याआधी नायजेरियात सादर झाला आहे. आता GSMArena ने आपल्या रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्याने या फोनच्या भारतीय लाँचची माहिती दिली आहे. या रिपोर्टनुसार हा फोन पुढील आठवड्यात भारतात सादर केला जाऊ शकतो. जागतिक लाँचमुळे स्पेसिफिकेशन्स जरी समजले असले तरी Tecno Spark 8 च्या भारतीय किंमतीची माहिती मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे.  

Tecno Spark 8 चे स्पेसिफिकेशन्स  

Tecno Spark 8 एक अँड्रॉइड गो स्मार्टफोन आहे, जो अँड्रॉइड 11 गो व्हर्जनवर चालतो. ही गुगलची एक हलकी ऑपरेटिंग सिस्टम आहे, त्यामुळे या फोनमध्ये कमी रॅम देण्यात आला आहे. या फोनमध्ये कंपनीने 2GB RAM आणि 64GB स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच हा टेक्नो स्मार्टफोन मीडियाटेकच्या हीलियो पी22 चिपसेट वर चालतो. 

टेक्नो स्पार्क 8 मध्ये 6.5 इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन, 480nits ब्राईटनेस आणि 269ppi पिक्सल डेन्सिटीला सपोर्ट करतो. या फोनमधील ड्युअल रियर कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 16MP चा मुख्य सेन्सर आणि एक क्यूवीजीए लेन्स देण्यात आली आहे. हा फोन 8 MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी टेक्नो स्पार्क 8 स्मार्टफोनमध्ये 10वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. 

Tecno Spark 8 ची किंमत  

नायजेरियात Tecno Spark 8 स्मार्टफोनचा एकच व्हेरिएंट आला आहे. 2GB RAM आणि 64GB इंटरनल स्टोरेज असलेला हा फोन 55,000 Nigerian Naira मध्ये विकत घेता येईल. ही किंमत 9,500 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते.  

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड