शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
2
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
3
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...
4
भाजपा नेत्यासमोरच पत्नीची हत्या, धारदार हत्याराने चिरला गळा, दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेमुळे खळबळ  
5
पगारवाढीचा 'T' फॅक्टर! TOR म्हणजे काय? ज्याशिवाय ८ वा वेतन आयोग लागू होणार नाही, लगेच जाणून घ्या!
6
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
7
ग्रीन झोनमध्ये शेअर बाजाराची कामकाजास सुरुवात; मोठ्या चढ-उतारासह 'हे' शेअर्स उघडले
8
'निमिषा प्रियाला अजिबात माफ केले जाणार नाही, तिला ताबडतोब फाशी द्या', तलालच्या भावाने तिसऱ्यांदा दाखल केली याचिका
9
Tarot Card: ध्येयपूर्तीकडे वाटचाल करायला लावणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
10
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
11
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
12
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
13
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
14
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
15
Viral Video : भर रस्त्यात हाय वोल्टेज ड्रामा! पत्नीने पतीच्या कानशिलात लगावल्या, कशावरून सुरू झालेला वाद?
16
आमिर खानच्या कुटुंबियांनी जारी केलं स्टेटमेंट, भाऊ फैजल खानचे सर्व आरोप फेटाळले
17
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
18
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
19
Video: अल्लू अर्जुनने विमानतळावर अधिकाऱ्यासमोर दाखवला माज; अखेर काढावाच लागला मास्क
20
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!

6,000mAhची मोठी बॅटरी असलेला किफायतशीर फोन Tecno Spark 7T, येईल लवकरच भारतात  

By सिद्धेश जाधव | Updated: June 5, 2021 13:16 IST

Tecno Spark 7T launch: Tecno Spark 7T मध्ये 4 जीबी रॅम, 48MP कॅमेरा आणि 6,000mAh बॅटरी आहे.  

Tecno कंपनी नेहमीच कमी किंमतीत लो बजेटमध्ये फोन्स लाँच करत असते. हे फोन्स कमी किंमतीत पण चांगल्या फीचर्ससह येतात. आता कंपनी Tecno Spark 7 सीरीजमध्ये लवकरच नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे, ज्याचे नाव Tecno SPARK 7T असेल. यापूर्वी या सीरीजअंतगर्त Tecno Spark 7, Tecno Spark 7 Pro आणि Tecno Spark 7P हे स्मार्टफोन लाँच झाले आहेत. (Tecno spark 7t will soon launch in India in low budget phone category)  

Tecno Spark 7T ची लाँच डेट समोर आली नाही परंतु लवकरच भारतात हा फोन लाँच केला जाईल. हा फोन लाँच होण्यापूर्वीच याचे काही स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. रिपोर्ट्सनुसार, हा फोन 6.52 इंचाच्या एचडी+ आयपीएस डिस्प्लेसह येईल. तसेच, फोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज मिळेल. टेक्नोच्या या आगामी फोनमध्ये  48 मेगापिक्सलचा कॅमेरा असू शकतो. पावर बॅकअपसाठी Tecno Spark 7T मध्ये 6,000 एमएएचची दमदार बॅटरी देण्यात येईल. 

या सिरीजमधील Tecno Spark 7 Pro चे स्पेसिफिकेशन्स  

टेक्नो स्पार्क 7 प्रोमध्ये 6.6 इंचाचा फुल-एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे, या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 720 x 1600 पिक्सल आणि रिफ्रेश रेट 90 हर्ट्ज आहे. हा फोन Android 11 आधारित HiOS 7.5 वर चालतो. फोनमध्ये MediaTek Helio G80 प्रोसेसर देण्यात आला आहे. Tecno Spark 7 Pro 4 जीबी व 6 जीबी रॅम आणि 64 जीबी व 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. 

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, यात मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 5,000 एमएएचची बॅटरी आहे.  

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान