SMS Fraud Detection Trick : याहू मेसेंजर, WhatsApp, फेसबुक येण्याआधी SMS हा निरोप पाठवण्याचा सर्रास वापरला जाणारा प्रकार होता. ते पाठ्वण्याचेही पैसे लागत असत. आता अनलिमिटेड कॉलिंगच्या जमान्यात SMS ला फारसे महत्त्व राहिले नाही. तरीदेखील OTP तसेच बँक व्यवहाराशी संबंधित मेसेज आजही SMS वरच पाठवले जातात. मात्र याच मेसेजच्या भाऊ गर्दीत फ्रॉड मेसेज शिरकाव करतात. ते मेसेज न उघडताही स्कॅम असल्याचे कसे ओळखायचे ते जाणून घ्या.
SMS उघडून पाहताना त्याच्या शेवटच्या अक्षरावरून तो मेसेज फ्रॉड आहे की महत्त्वाचा हे लक्षात येईल. जर तुमच्या SMS च्या शेवटी S, P, G, T यापैकी एखादे अक्षर असेल तर त्या SMS चा धोका नसतो. कारण G अर्थात गव्हर्नमेंट कडून पाठवलेला मेसेज, S असेल तर तो सर्व्हिस मेसेज, T असेल तर ट्रान्झॅक्शन मेसेज (बँक तसेच UPI संदर्भात मेसेज), P असेल तर तो प्रमोशनल मेसेज असतो.
यापैकी कोणतेही अक्षर नसेल आणि तुम्हाला जर कोणी OTP विचारत असेल तर तो फ्रॉड मेसेज असू शकतो हे लक्षात ठेवा. हा एकप्रकारचा स्कॅम असू शकतो. स्कॅमर S, P, G, T या अक्षरांचा वापर करू शकत नाही, कारण ती अक्षरं मिळवण्यासाठी TRI अर्थात टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटीकडून पर्मिशन घ्यावी लागते.
त्यामुळे अनोळखी मेसेज ओपन करण्याआधी वरील पैकी कोणते अक्षर जोडले आहे का ते बघा आणि नंतरच ते उघडून पहा.